शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
पुणे:-अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग चॅम्पियनशिप - २०२१ या स्पर्धा जालंधर (पंजाब)या ठिकाणी होणार असून या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉक्सिंग महिला संघ नुकत्याच बी. जे. एस. कॉलेज वाघोली याठिकाणी झालेल्या आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्ध्ये मधून निवडला गेला आहे.
अभिमन्यू सुर्यवंशी हे गेल्या अनेक वर्षांपासून या संघाच्या प्रशिक्षक पदी असताना अनेक खेळाडू हे प्रावीण्य पदक विजेते झाले आहेत. विद्यापीठ क्रीडा विभागाच्या वतीने त्यांची एकमताने निवड झाली असून या संघाच्या व्यवस्थापकपदी प्रा.अमित गिरिगोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
या संघाच्या यशस्वीतेसाठी डॉ.दीपक माने (संचालक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,क्रिडा मंडळ ),डॉ. दत्ता महादम (सहसंचालक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्रिडा मंडळ),ॲड.बी.जी. अगवणे (कार्याध्यक्ष - पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना),श्री.भरतकुमार व्हावळ (सचिव - पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना),श्री.मदन वाणी (सचिव - पुणे शहर बॉक्सिंग संघटना),श्री.विजय गुजर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच) यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

