shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकन्यायालयात महसूल विभागाची १ लाख साठ हजार रुपयांची वसुली..

एरंडोल-एरंडोल तालुका विधी समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लॉकन्यायालयात महसूल विभागाने प्रथमच सहभाग घेतला.यावेळी महसूल विभागाची १ लाख ६३ हजार ६३८ रुपयांची थकबाकी वसूल झाली असून त्याचा शासनाकडे भरणा करण्यात आला.

    लोकन्यायालयात महसूल विभागाने थकबाकी असलेल्या खातेदारांना लेखापरीक्षणाच्या वसुलीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.लोकन्यायालयात थकबाकीदारांनी देखील प्रतिसाद देऊन सुमारे १ लाख ६३ हजार ६३८ रुपयांचा भरणा केला.तसेच काही थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्यात आली.ज्या थकबाकीदारांनी भरणा केला त्यांचे तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी आभार मानले.लोकन्यायालय हि सर्व थकबाकीदार खातेधारकांसाठी शासकीय महसुलाचा भरणा करण्याची सुवर्ण संधी असून महसूल वसुलीसाठी बोजा अथवा जप्तीची कारवाई टाळण्यासाठी आगामी काळात होणा-या लोकन्यायालयात थकबाकीदार खातेधारांनी सहभागी होऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी केले.यावेळी निवासी नायब तहसीलदार एस.पी शिरसाठ,मंडलअधिकारी यु.बी.निंबाळकर,विनायक मानकुम्बरे,मुकेश जाधव,मनोज शिंपी,तलाठी सलमान तडवी,सदानंद मुंडे,विलास धाडसे,विश्वंभर शिरसाठ,शकील शेख,अनिल सुरवाडे,अण्णासाहेब सुर्वे,सुवर्णा काळे,मनीषा पोटे,सुरेश कटारे यांचेसह महसूल कर्मचारी व खातेदार उपस्थित होते.


close