shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख पी बी कोकरे यांचा वाढदिवस आजारग्रस्त रुग्णास मदत करून मैत्रकुल जीवन विकास केंद्राच्या मुलांसोबत साजरा..!



जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे हे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व असून गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य  वंचित घटकावर होत असणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शासन दरबारी आवाज उठवून अनेक पडीत कुटुंबीयांना न्याय देण्याचे काम करत आहेत.

एक आक्रमक अष्टपैलू सडेतोड पष्टवादी वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. पाठीशी कोणताही राजकीय वारसा नसताना सामाजिक क्षेत्रात संविधानिक अधिकारानुसार अन्याय भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक रथी-महारथीना पुरून उरणारे सर्वसामान्यांच्या बाजूने कायम उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेचं पी बी दादा कोकरे होय !!

लोकशाहीच्या राज्यात सर्व जाती धर्मातील सर्वसामान्यांना आपला अधिकार मिळाला पाहिजे हा हेतू मनी बाळगून भ्रष्टाचार दबावतंत्राच्या विरोधात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपून  आंदोलन उपोषण करून वंचित घटकास न्याय मिळवून देण्याकरिता खुल्ले बंड  पुकारणे म्हणजेच श्री पी बी दादा कोकरे होय !!

अशा लढवय्या  एम के एस प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांचा २४ नोव्हेंबर २०२१ रोजीचा वाढदिवस आजारग्रस्त रुग्णास उपयुक्त वस्तूची मदत करून व मैत्रकुल जीवन विकास केंद्राच्या लहान मुलांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

श्री पी बी कोकरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी पुढाकार घेणारे मैत्रकुल जीवन विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष किशोर दादा जगताप सामाजिक नेते इम्तियाज भाई शेख,सुनील भाई कमुर्ले,विलास भाई जगताप,निलेश भाई गायकवाड,सावन कांबळे व सर्व सहकारी मित्र मंडळी बंधू भगिनींचे श्री पी बी कोकरे यांनी मनापासून मानले आभार !!
close