shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरिकांनी आपल्या शुभ कार्यात सतर्कतेचे आवाहन -चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१

चोरट्यांकडुन चोरीचा असाही नवा फंडा; तुम्हाला बसु शकतो लाखो रुपयांचा गंडा..
वधु कक्षात अनोळखी मुले व महिलांकडून होऊ शकते चोरी; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे सतर्कतेचे आवाहन!!!!!
कर्जत : लग्न म्हटलं की आनंदाचा अविस्मरणीय प्रसंग…शुभाशिर्वाद देण्यासाठी ओळखी-अनोळखी नातेवाईकांची गर्दी…पण या गर्दीत ‘साव’ कोण अन् ‘चोर’ कोण? हे ओळखणे तितकेच कठीण…जरी कुणी चोर असला तरी या मंगलप्रसंगी तो सावच!
मात्र योग्य सतर्कता पाळली नाही तर आपण व आपले नातेवाईक अशा घटनांचे बळी पडु शकतात.बघा नाहीतर असा प्रकार आपल्या सोबत तर घडला नाही ना? हो! कारण, सध्या अनोळखी चोरटे कुणाच्याही लग्न सोहळ्यात आपल्या लहान मुलांना किंवा महिलांना वधुच्या कक्षात पाठवुन सोन्याच्या दागिन्यांची पिशवी आपल्या हातचलाखीने चोरून क्षणात पसार होतात.नातेवाईकांची गर्दी असल्याने चोरीची पुसटशी कल्पनाही कुणाच्या मनात येत नाही आणि चोरटे आपला डाव साधुन पसार होतात.चोरी होऊन बराच वेळ होऊन जातो आणि थोड्या वेळाने दागिने गायब झाल्यावर याबाबत गोंधळ निर्माण होतो.एरव्ही चोऱ्या होताना अनोळखी चोरट्यांना त्यांच्या कृतीवरून आपण ओळखू शकतो मात्र असंख्य माणसांच्या गर्दीत अनोळखी माणसांतील चोर ओळखणे अवघड होऊन बसते त्यामुळे अनोळखी महिला व मुलांच्या शेजारी बसताना आपले मौल्यवान दागिन्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. विवाहाच्या मुख्य सभागृहात ही काळजी घेणे तर गरजेचे आहेच पण विशेषतः नववधूच्या कक्षांमध्ये अशा चोऱ्यांचे प्रकार तात्काळ घडतात. त्यामुळे मौल्यवान साहित्य उघड्यावर न ठेवता ते लॉकर व सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. अंगावर घातलेल्या दागिन्यांवरही अधिकचे लक्ष देणे आवश्यक आहे.

नागरिकांनो अशी घ्या काळजी!
"विवाह समारंभात गर्दीत आपल्या मौल्यवान वस्तू चोरट्यांपासुन सांभाळाव्यात.विशेष करून वधूच्या कक्षात कोणत्याही अनोळखी महिला व मुलांना प्रवेश करू देऊ नये. स्वतः वधु व नातेवाईकांनी तशी काळजी घ्यायला हवी. सतर्कतेबाबत बोर्ड लावणेही उत्तम राहील.उपस्थितांना मोठ्या आवाजात सुचना मिळतील याची दक्षता घ्यावी म्हणजे अनोळखी व्यक्तींपासून चोरी होणे रोखता येईल. मंगल कार्यालय मालक, चालक यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
-चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक कर्जत"
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close