shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विविध मागण्यांबाबत उपोषण सुरू तर अॅड. राहुल मखरे यांचा आज २ वाजता रास्ता रोको. राहुल मखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती.

विविध मागण्यांबाबत उपोषण सुरू तर अॅड. राहुल मखरे यांचा आज २ वाजता रास्ता रोको.

ॲड.राहुल मखरे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली माहिती.

इंदापूर प्रतिनिधी: नगरपरिषदेतील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा व वारसा हक्काने नोकरीस घेण्यात यावे., वरकुटे खुर्द, ता. इंदापूर, जि. पुणे या ग्रामपंचायतमधील कागदपत्रे हेतू परस्पर गहाळ केले बाबत., इंदापूर नगरपरिषद मतदार यादीतील बोगस नावे कमी करणे संदर्भात, इंदापूर नगरपरिषदेतील कामावर रुजू असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वानुसार सेवेत रुजू करायला हवे होते. परंतु अद्यापपर्यंत जाणून बुजून कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. वारस माधुरी बाळू पवार, महेश दशरथ सरवदे, सारिका चंद्रकांत सोनवणे, शिवाजी तानाजी मखरे यांना तत्काळ रुजू करुन घेण्यात यावे, मौजे वरकुटे खुर्द, ता. इंदापूर,जि. पुणे येथील अनुसुचित जातीच्या लोकांची जमिन बळकवणारे व त्या जागेची कागदपत्रे ग्रामपंचायतीमधून हेतू परस्पर गहाळ करणारे तत्कालीन ग्रामसेवक मल्हारी येदू झगडे यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत,  तसेच इंदापूर नगरपरिषदेच्या मतदार याद्यांमध्ये साधारण २५०० मतदार बोगस आहेत. सदरची बोगस नावे कमी करण्यात यावीत, असा उच्च न्यायालयाचा लेखी आदेश २०१६ मध्ये मा. जिल्हाधिकारी . यांनी पुढील कार्यवाहीसाठी मा. प्रांताधिकारी सो. बारामती यांना सुचित करण्यात आले. मा. प्रांताधिकारी सो, यांनी तत्कालीन तहसिलदार सो. इंदापूर यांना पुढील कार्यवाहीसाठी सुचित केले. परंतु अद्याप पर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे,उच्च न्यायालयाचा अवमान केल्याबाबत आणि कर्तव्यात कसुर केल्याबाबत संबंधित बीएलओ व डाटा ऑपरेटर सोमनाथ माने यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. आशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली, ते म्हणाले की, वरील मागण्यांसाठी दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी पासून इंदापूर नगरपरिषदेसमोर अँड. राहुल रत्नाकर मखरे व बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर चे पदाधिकारी आमरण उपोषण करत आहे. आज दि. ७/१२/२०२१ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत जर यावर कोणताही तोडगा काढला गेला नाही तर आज दुपारी २ वा. एस.टी. स्टॅण्डसमोर जुना पुणे सोलापूर रोडवर रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरीही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर उद्या दि. ८/१२/२०२१ रोजी नगरपालिकेस टाळे लगा ओ आंदोलन करुन जेल भरो करण्यात येणार आहे.आशी माहीती पत्रकार परिषदेत अॅड, राहुल मखरे यांनी दिली, या वेळीमा. मुख्याधिकारी सो., जि.प.पुणे, मा. तहसिलदार सो. इंदापूर , मा. मुख्याधिकारी सो., इंदापूर न.प. इंदापूर ,मा. पोलिस निरीक्षक यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत,
close