शिरसगाव (बाबासाहेब चेडे) - येथील साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी एकनाथ काळे यांना चंद्रपूर येथील राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार मुकुटबन येथील श्री. गजानन महाराज महाविद्यालयाचे प्रो.तथा मराठी विभाग प्रमुख आणि शब्दांगणचे प्रमुख डॉ.अनंता सूर यांनी प्रदान केला.
साहित्य प्रबोधन मंचचे संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये, सुयश काळे,कु.सुकन्या काळे, सौ.गायत्री सूर, कु. स्वरांगी सूर, स्वरांग सूर यावेळी उपस्थित होते. डॉ. अनंता सूर यांनी आपल्या संस्थेचे कार्य आणि डॉ. शिवाजी काळे यांचे गुणवत्ता पूर्ण लेखन "गावकुसातल्या गोष्टी "या ग्रामीण विनोदी कथासंग्रहाचे साहित्यमूल्य विशद केले. डॉ. काळे यांचे लेखन हे मराठी साहित्यविश्वात खास नगरी बोलीचा प्रत्यय देणारा असल्याचे सांगून त्यासाठी श्रीरामपूर येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करताना विशेष आनंद वाटला असे सांगून श्रीरामपूरात डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे आणि त्यांचे सहकारी प्रामाणिकपणे वाचन संस्कृती जोपासत असल्याबद्दल कौतुक केले. डॉ. उपाध्ये यांनी डॉ.सूर हे श्रीरामपूरला आले आणि साहित्य परिवाराला संबोधित केले त्याबद्दल गौरवोद्गार काढले, डॉ. शिवाजी काळे यांनी दर्जेदार लेखन करून आपल्या आत्मपर आठवणी लिहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. शिवाजी काळे यांनी डॉ. सूर आणि सूर परिवार श्रीरामपूर येथे आले,पुरस्कार दिला त्याबद्दल आनंद व्यक्त करीत डॉ. अनंता सूर यांचा साहित्य प्रबोधनतर्फे सत्कार केला.सुयश काळे यांनी आभार मानले.

