शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
राहुरी : तालुक्यातील मोरेवाडी (वांबोरी) येथे जिल्हा परिषद सदस्य सौ शशिकलाताई पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने वांबोरी मोरेवाडी ते उंबरे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच वांबोरी मोरेवाडी चिंचाचा मळा ते संगमेश्वर मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. शशिकलाताई पाटील यांनी जिल्हा परिषद निधीतून भरीव निधी उपलब्ध करून या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ ॲड सुभाष पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
सदर रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण होती. तसेच संगमेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झालेला होता. पावसाळ्यातील या रस्त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला त्याबद्दल मोरेवाडी येथील शेतकऱ्यांनी सौ. शशिकलाताई पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.
सदर कामाचा शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी चेअरमन सुभाष पाटील बोलत होते की, रस्त्याचे कामाची तात्काळ कारवाई होऊन लवकरच भक्कम रस्ता पूर्ण केला जाईल. शेेतकऱ्यांंची गैर सोय दुर केली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी मोठ्या संख्येने मोरेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी सदर रस्त्याबाबत या भागातील शेतकऱ्यांनी रस्ता होणेसाठी मागणी केली होती. त्यामुळे सदर रस्ता कामासाठी त्या वेळी शब्द दिलेला पूर्ण केल्याचे समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी वांबोरी गावचे सरपंच किरण ससाने, ग्रामपंचायत सदस्य सारंगधर पटारे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच दत्तात्रय मोरे, माजी सदस्य भास्कर मोरे, प्रा. शाम पठारे तसेच काशिनाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य अँड ऋषिकेश मोरे, तुकाराम मोरे, शरद मोरे, प्राध्यापक डि के मोरे, ढोकणे गुरुजी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे, कानिफ सत्रे, देविदास बोरकर, रामभाऊ बोरकर, अशोक मोरे, वांबोरी सोसायटीचे चेअरमन अण्णा गंगाराम मोरे, विलास गुंजाळ, भाऊसाहेब मोरे, रविकिरण पटारे, पोपट मोरेे, बाजीराव मोरेे, मारुती मोरेे, बाबू मोरे, नरेश जगदाळे, जालिंदर मोरेे, के .के माळवदेे, पांडुरंग मोरे, इनामदार मुन्नाभाई, अरविंद मोरे, मच्छिंद्र जगदाळे तसेच वांबोरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गागरे तसेच मोरेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

