शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा
लातूर :- बुधवार दिनांक २ जून २०२१, अनघाष्टमी! आज पहाटे दृष्टांतात द्वारकामाईचा एक फोटो माझ्या हातात होता. त्या फोटोत सतगुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांची नित्य वापरातील लाकडी आराम खुर्ची द्वारकामाईत होती व खुर्चीत गोपाल बाबांचा नाही तर श्रीपाद श्रीवल्लभांचा गाईला रेलून उभा असलेला फोटो होता. खुर्चीच्या उजव्या हाताला रामकृष्ण परमहंस श्रीपादांच्या फोटोला हात जोडून उभे होते. हे सर्व डिटेल्स असलेला फोटो मला डिस्ट्रिक्ट कलेक्टरला द्यायचा होता. पण तेथे उपस्थित असलेला एक सावळ्या वर्णाचा इसम त्यात अडथळे निर्माण करत होता.
परवा रात्री फेसबुकवर गोपालबाबांवर असलेल्या लिखाणावरएका सद्गृहस्थाने प्रतीदत्त असलेल्या परमपूज्य परिव्राजिकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी महाराजांच्या प्रचंड ग्रंथ संपदेत गोपालबाबांविषयी चकार शब्द नसल्याने गोपाल बाबांबद्दलचे लिखाण लोकांपर्यंत का पोहोचवायचे असा प्रश्न उपस्थित केला.
आता श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय ४ व वरील दृष्टांत पाहू. अध्याय चार अनुसार रामकृष्ण परमहंस यांनी कलकत्त्यातील दक्षिणेश्वर येथे आपले आराध्य दैवत कालीमातेची परवानगी मागितली की मला देह विसर्जित करण्यास परवानगी द्यावी. कालीमाता म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता. रामकृष्णांच्या शरीर सोडण्याच्या विनंतीवर मातेने श्रीपाद श्रीवल्लभांशी विनिमय करून साईबाबांना त्वरित तीन दिवस कलकत्त्यातील दक्षिणेश्वर येथे पाचारण केले. रामकृष्णांच्या शिष्य परिवाराचा भार साईबाबांकडे सोपविण्यात आला. त्यासाठी मातेने आणि श्रीपादांनी आपले विशेष अंश साईबाबांमध्ये अंतर्लिन केले व साईनाथ परत शिर्डीत आले. तोपर्यंत म्हाषसापतींनी साईनाथांचा देह निद्रिस्त अवस्थेत जपून ठेवला होता. साईनाथ परत येताच मशिदीस माता श्री वासवी कन्यका परमेश्वरी मुळे द्वारकामाई म्हणून संबोधू लागले. यावेळी आपला स्वामी समर्थ अवतार समाधिस्थ करून श्रीशैल्य मल्लिकार्जुन शिवलिंगात प्रविष्ट असलेले श्रीपाद साईनाथांमध्ये विलीन झाले व साईरुपात भक्तजन रक्षणार्थ कार्य सुरू झाले.
आता खुर्ची गोपालबाबांची आणि विराजमान आहेत श्रीपाद श्रीवल्लभ! याच गोपालबाबांचा उल्लेख अध्याय ४५ मध्ये हनुमंत व श्रीपाद श्रीवल्लभ संवादात हनुमंत रुपी साईबाबांचे गुरू महाविष्णू, वेंकुसा, गोपालराव माधवराव देशमुख म्हणून आहे.
अध्याय चार मध्ये टेंबे स्वामीना राजमुंद्री येथे श्रीपादांच्या मातुल घराण्यातील पंडितांनी शुद्धीकरण करण्यासाठी व साईबाबांना दाखवून त्यांचे प्रमाण मागण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ मुळ संस्कृत चरित्र दिले नाही याचा उल्लेख आहे व शिर्डीत साईबाबांकडे तुमचं श्रीफळ पोहोचणार नाही, तुमच्या हातून पिठिकापुरात श्रीपाद जन्म स्थानी पादुका प्रतिष्ठापित होणार नाही कारण त्याचं नियोजन वेगळे व नंतर आहे असं त्यांनी टेंबे स्वामींना सांगितले. इथं टेंबे स्वामींनी साईबाबांचा उल्लेख माझे जेष्ठ व उन्नत स्थितीतील मोठे बंधू असा गौरवपूर्ण केला आहे.
अध्याय चार हा कुरवपूर, कलकत्ता, शिर्डी, काली माता, वासवी माता, श्रीपाद, रामकृष्ण परमहंस, साईबाबा, हनुमंत, गोपाल बाबा,
श्रीपाद अवधूत रुपात पिठापुरात अवतरणं, तिथेच समाधिस्थ झाल्यानंतर भक्त काम समाधी तून पूर्ण करत रहाणे यावर केंद्रीत आहे.
फोटो कलेक्टरला का द्यायचा तर ही सरकार मान्यता आहे म्हणून सरकार दरबारी जतन करण्यासाठी!
श्री गुरुचरित्र ज्याला आपण प्रमाणग्रंथ मानतो त्यात श्रीगुरू नरसिंह सरस्वती "गुरू शिष्य रुपे क्रिडीसी" असा अवतरणिकेत स्पष्ट उल्लेख आहे. हे सर्व लक्षात घेता श्रीपाद वेगळे, हनुमंत वेगळे, साईनाथ वेगळे, गोपालबाबा वेगळे अशी विचारांची पद्धत अध्यात्मिक प्रगती साठी बाधक ठरू शकते. ज्याची भक्ती करायची त्याचे अवतार नाकारायचे म्हणजे राजवाड्यात जायचे पण राजा सोडून राजघराण्यातील मातब्बरांचा द्वेष करायचा असे होईल. हे जर राजाला कळले तर आपणावर श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय दोन मध्ये विचित्रपुरात राजदरबारात शंकर भट्टांवर जी परिस्थिती ओढावली ती ओढावून अजून एक अध्याय अक्षरसत्य व्हायचा!!!
शब्दरचना :-
प.पु.बापु महाराज,
लातूर.
#shripadshrvallabha #gopalbaba #dattaguru #dattatreya #swamisamarth #swami #Datta #gurucharitra

