शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१
"वाडिया पार्क येथे झालेल्या नॅशनल रन ओपन चॅम्पियन २०२१ स्पर्धेमध्ये स्वरूपा महेश रावस या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकावल्याने आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी तिचा सत्कार केला."
अहमदनगर : वाडिया पार्क येथे नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होउन नॅशनल रन ओपन चॅम्पियन २०२१ स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावल्याने प्रथम पारितोषिक वितरप्रसंगी महेश रावस या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले
शालेय शिक्षणाबरोबरच आजच्या युवकांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे,विविध क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जिद्द,चिकाटी,मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी. खेळामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होती. मुलांप्रमाणे मुलींनीही जास्तीत-जास्त आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्राकडे वळावे व खेळाडू स्वरूपा रावस हीचा आदर्श डोळ्यासमोर बाळगावा असे प्रतिपादन आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी व्यक्त केले.
वाडिया पार्क येथे झालेल्या नॅशनल रन ओपन चॅम्पियन २०२१ स्पर्धेमध्ये स्वरूपा महेश रावस या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकावल्याने आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी तिचा सत्कार केला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

