shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इस्त्रो सहलीचे नियोजन करण्याचे प्रशासनासह सदस्यांना पडलाय विसर माञ शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेतलाय हाती ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२१

अहमदनगर : कोरोना महामारीमुळे अनेक कार्यक्रम ठप्प झालेले आहेत. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी सांस्कृतिकसह इतर कार्यक्रम घेतले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनही मागे नाही. 
जिल्हा परिषद प्रशासनानं आता शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून त्याचे नियोजन करण्यात शिक्षण विभाग व्यस्त आहे. मात्र विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा इस्त्रो सहलीचे नियोजन करण्याचे प्रशासनासह शिक्षण विभागाला विसर पडल्याने पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आरे.
इस्त्रो सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमात आता खंड पडलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनासह पदाधिकारी व सदस्यांनी शाळा सुरु करण्याबाबत नियोजन केले. मात्र इस्त्रो सहलीचे नियोजन करण्याचे प्रशासनासह सदस्यांना विसर पडलेला आहे. 
विशेष म्हणजे पदाधिकार्यांसह सदस्य कोरोनाचा काळ कमी झाल्यानंतर सहलीसाठी जाऊन आलेले आहेत. तसेच नियोजन जर विद्यार्थ्यांच्या सहलीचे प्रशासनासह पदाधिकार्यांनी केले असते तर योग्य झाले असते, अशी प्रतिक्रिया आता पालकांमधून व्यक्त केसी जात आहे.
प्रशासनाने आता शिक्षक पुरस्कार वितरणाची तयारी सुरु केलेली आहे. परंतु अनेक सत्कार समारंभाचे कार्यक्रम गेल्या दोन महिन्यात प्रशासनाने टाळले आहेत. परंतु आता पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम हाती कसा घेतला असा सवाल आता अनेकांमधून व्यक्त केला जात.आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close