shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा संपन्न!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त शिक्षक दिनी  विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज आयोजित आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले.




कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेशराव खंदारे, प्रमुख पाहुणे बाल विकास अधिकारी आर डी कुलकर्णी,जी बी गदळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले

आदर्श शिक्षक पुरस्कार विक्रम डोईफोडे ,सुरेखा भोसले, आदर्श पत्रकार पुरस्कार गौतम बचुटे, आदर्श शेतकरी पुरस्कार गोविंद गायकवाड, वृक्षमित्र पुरस्कार दत्तात्रय ठोंबरे यांना देऊन गौरविण्यात आले यावेळी संशोधनात उत्तम कार्य करणाऱ्या प्रा डॉ नवनाथ काशीद डॉ हनुमंत सौदागर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना खंदारे म्हणाले विविध क्षेत्रात महात्मा फुले यांनी योगदान दिले त्यांचा वारसा आपण सर्वांनी चालवला पाहिजे आदर्श कार्य करणाऱ्यांना पुरस्कारातून ऊर्जा मिळत असते असे मत व्यक्त केले.

आर डी कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा देऊन कर्तेपणा जपण्याचा मानस व्यक्त केला. गौतम बचुटे यांनी कार्यकर्ता ना पुरोगामी विचारांची दिशा समोर ठेवून कार्य केल्यास तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचतो येते असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत भोसले यांनी केले सूत्रसंचालन हनुमंत घाडगे यांनी केले आभार विष्णू यादव यांनी मानले. कार्यक्रमास पुरोगामी वैचारिक चळवळीतील नागरिक उपस्थित  होते.

close