shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आळेफाटा पो. स्टे. चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचेशी पत्रकार नामदेवराज पवार यांनी केली साधक बाधक चर्चा..!

जुन्नर । प्रतिनिधी :
आळेफाटा पो.स्टे.चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक आदरणीय प्रमोद क्षीरसागर साहेबांची नामदेवराज पवार यांनी भेट घेऊन यथोचित सन्मान करून आळेफाटा हद्दीतील वाढत्या चोरी, दरोडा, विविध  घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात साधक बाधक  सविस्तर चर्चा केली. साहेबांनी पुणे, मुंबई, चाकण MIDC यासारख्या ठिकाणी काम केलेले असल्यामुळे त्यांना SMART पोलिसिंग चा उत्तम अनुभव आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्या आहेत. 

 क्षीरसागर साहेब यांचा सत्कार करताना
नामदेवराज पवार, संजोक काळदन्ते, विशाल गाडगे


आळेफाटा पोलीस स्टे. हद्दीत शंभरहून अधिक CCTV कॅमेरे लावण्याचा संकल्प असल्याचा मनोदय साहेबांनी बोलून दाखविला व त्या दृष्टीने सूचनाही निर्गमित केल्याचे समजते.एक सुजाण आणि सजग नागरिक म्हणून आपण सर्वांनी त्यांना त्यांच्या कायदा व सुव्यस्थेच्या  कार्यात मोलाची साथ देऊया. साहेबांचे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात सहर्ष स्वागत आणि पुढील वाटचालीस पवार यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
close