shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे ४ लाख मे. टन गाळप पूर्ण.

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे ४ लाख मे. टन गाळप पूर्ण.
इंदापूर : प्रतिनिधी (दि. ३१ डिसेंबर २०२१)
        महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये आज शुक्रवार (दि.३१) अखेर ४ लाख ११११ मे. टन ऊसाचे गाळप पुर्ण करून महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
      कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्ठपणे सुरु असून दररोज प्रतिदिनी सरासरी ९००० मे. टना हुन अधिक क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने चालु आहेत, अशी माहीती कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली. 
       कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी  कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादकांशी गटनिहाय बैठका घेऊन संवाद साधला. या संवाद बैठकांचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसत आल्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम उपस्थित होते. 
*चौकट :-
  ====
हर्षवर्धन पाटील यांचेकडून ब्रीच कँडी रुग्णालयातून अभिनंदन
--------------------------------------
माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी गुरुवारी दाखल झाले आहेत. कारखान्याने 4 लाख गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून आज ( शुक्रवारी ) संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. प्रकृती उत्तम असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले

___________________________
close