shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहिगांव-ने तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बेकायदेशीर बांधकामाची चौकशी होऊन दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी..!

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री ताई यांच्या बरोबर चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही..?

जिल्हा परिषद कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून  प्राणांतिक उपोषण सुरू..!

लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल..!.

अहमदनगर । प्रतिनिधी : गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते राजेभोसले प्रविण खोमणे यांचे प्राणांतिक उपोषण सुरू..!
लवकरात लवकर मागण्या पूर्ण करा अन्यथा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करू.


जिल्हा परिषद कार्यालयासमोर दहिगांव -ने तालुका शेवगाव येथील १-१२-२०२१ रोजी झालेल्या एक दिवसाचे प्रांणातिक उपोषण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यानंतर या उपोषणाला स्थगिती दिली होती.परंतु आजपावेतो कुठलीही कारवाई केली नाही.दहिगांव-ने तालुका शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची बेकायदेशीर झालेले बांधकाम कुठल्याही प्रकारचा ७/१२ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर नसतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी कसं काय दिला. गेल्या पन्नास वर्षापासून वि.वि.सेवा सहकारी सोसायटी दहिगांव-ने तालुका शेवगाव यांच्या नावे ७/१२ आहे व होता त्या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांनी बांधकाम केले कसे व कोणाच्या सांगण्यावरून केले. या भ्रष्टाचारी अधिकारी व पद अधिकारी यांची चौकशी करुन दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.याकरिता शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय एस.राजेभोसले व प्रवीण शंकर खोमणे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. या उपोषणा संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले यांच्या समोर चर्चा होऊन कुठल्याही प्रकारचा मार्ग निघाला नाही. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे साहेब उपस्थित होते.

           या चर्चेत प्रवीण खोमणे यांनी सांगितले की लवकरात लवकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.  जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुंबई येथील मंत्रालयासमोरील आझाद मैदानावर मोर्चा आमरण उपोषण करू. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही प्राणांतिक उपोषण सोडणार नाही.
close