ज्ञानदेव शिंदे यांनी मुलाचा वाढदिवस आश्रम शाळेतील मुलांना किराणा किट व बिस्किट बॉक्स, वह्या पेन, गरजू साहित्य देत केला साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे यांनी त्यांचा मुलगा राजविर याच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त मदर तेरेसा सामाजिक विकास संस्थेचे कै. शांताराम पंढरीनाथ भूमकर सामाजिक संकुल चिंबळी तालुका खेड जिल्हा पुणे येथील आश्रम शाळेतील मुलांसाठी किराणा साहित्याचे किट, बिस्कीटचे बॉक्स, मास्क, एक्सटेन्शन बोर्ड, आणि वह्या, पेन देऊन अनोख्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत राजवीर ज्ञानदेव शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसानिमित्त अशा सामाजिक उपक्रमाचे संकल्पना विचारात आणून तो अमलात आणला त्याबद्दल संस्थेच्या वतीने ज्ञानदेव शिंदे यांचे विशेष धन्यवाद मानले. खरंच वाढदिवसा दिवशी इतर अवास्तव खर्च करण्यापेक्षा गरजूंना त्या खर्चातून सहकार्य केले तर त्यांच्या आनंदात आपला आनंद द्विगुणित होतो म्हणून असे सामाजिक उपक्रम राबवून आपला आनंद उत्सव साजरा करावा असा आदर्श शिंदे कुटुंबांनी आज घालून दिला असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी ज्ञानदेव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, माझा मुलगा राजवीर याच्या दुसर्या वाढदिवसानिमित्त आज संकल्प करतो की, इथून पुढे अशा पद्धतीने गरजूंना शक्य होईल त्या पद्धतीने सहकार्य करेन त्यांच्या आनंदात माझा आनंद मानेन आणि त्यांच्या आनंदरुपी आशीर्वाद आज माझ्या मुलाचा खरा आशीर्वाद असेल वाढदिवसानिमित्त ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मनापासून आभार.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रपती पुरस्कार विजेते मनोज गुंजाळ, सोपान मोरे सामाजिक कार्यकर्ते, मदर तेरेसा सामाजिक विकास संस्थेच्या शिक्षिका भारती ताई पाटील दीपाली शिंदे , राणी ताई मोरे आदी उपस्थित होते.

