shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एशेस मालिकेत इंग्लंडची राखरांगोळी तर सेंच्युरियन कसोटीत पावसाचे थैमान !



              बॉक्सिंग डे च्या शुभमुहूर्तावर मेलबोर्नमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात एशेस मालिकेतील तिसऱ्या  तर द. आफ्रिका व भारत यांच्या सेंच्युरियन येथे मालिकेतील पहिल्या कसोटीला शुभारंभ झाला. मेलबोर्नमध्ये कांगारूंनी पाहुण्या इंग्लंड संघावर पहिल्या दिवसापासून वर्चस्व ठेवत अवघ्या सव्वादोन दिवसात कसोटी जिंकली व मालिकेत तीन -शुन्य अशी विजयी आघाडी घेत एशेस आपल्याकडेच राखला. तर इंग्लंडचा या मालिकेत सलग तिसरा पराभव करत विजयाची हॅट्रीक साधली त्याचबरोबर इंग्लंडची एसेश मालिकेत शब्दशः राखरांगोळी केली.

              सेंच्युरियनवर सुरू झालेली भारत व द. आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी पहिल्या दिवशी पावसाचे सावट असतानाही निर्विघ्न खेळ झाला. सलामीवीर केएल राहुलचे झुंजार असे नाबाद शतक, त्याचा जोडीदार मयंक अग्रवालचे शानदार अर्धशतक व दोघांची संघाला मजबूती देणारी शतकी पायाभरणी व त्यानंतर दिवसाच्या अखेरपर्यंत नाबाद राहात अजिंक्य राहाणेने केली चाळीस धावांची आश्वासक खेळी भारताला परदेशात सामन्याच्या पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्य धावसंख्या गाठून देण्यात मोलाची सिद्ध झाली. या पार्श्वभूमिवर दुसऱ्या दिवशी भारत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करून आपली परिस्थिती भक्कम करेल अशा अपेक्षेने खेळाडूंसह सर्वच भारतीय समर्थक आशा लावून बसले होते. मात्र दुसऱ्या दिवशी वरूण राजाने संपूर्ण दिवसभर पाण्याची बरसात करून भारतीयांच्या आशेवरही पाणी सोडले.
               

           सामन्याच्या तिसऱ्या व चौथ्या दिवशी पूर्ण खेळ होण्याची शक्यता असून पाचव्या दिवशी शंभर टक्के पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीयांना सामना जिंकायचा असेल तर आपल्या रणनितीत बदल करून प्रथम झटपट धावा वाढविणे व पावसाचा व्यत्यय येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा गुंडाळावे लागणार आहे. मात्र दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसानंतर खेळपट्टी आफ्रिकन जलदगती गोलंदाजांना साहाय्य करू शकते व त्यानंतर भारताचे तेज गोलंदाजही खेळपट्टीचा फायदा उठवू शकतात. मात्र त्याआधी भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या रचून यजमान संघाला फॉलोऑनच्या विळख्यात जखडावे लागणार आहे.

                बॉक्सिंग डे टेस्ट एक डाव व चौदा धावांनी गमविल्यानंतर इंग्लंडच्या सन २०२१ मधील पराभवांची संख्या नऊ इतकी झाली असून एका वर्षात सर्वाधिक कसोटी पराभव स्विकारणाऱ्या बांगलादेशच्या अपमानास्पद विक्रमाशी इंग्लंडने बरोबरी साधली आहे. इंग्लंडने या वर्षी भारतात तीन - एक व मायदेशात भारताविरूध्द दोन - एक अशी मालिका गमावली आहे. शिवाय न्यूझिलंड विरूध्द ही मायदेशात एक -शुन्य असा पराभव इंग्लंडच्या पदरी पडला होता. या वर्षात इंग्लिश कर्णधार ज्यो रुट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाची बॅट तळपली नाही. शिवाय एका वर्षात सर्वाधिक चोपन्न फलंदाज शुन्यावर बाद होण्याच्या स्वतःच्या विक्रमाशी इंग्लंडने यंदा बरोबरी साधली आहे. शिवाय ऑस्ट्रेलियात सलग तेरा सामने हरण्याची नामुष्की इंग्लंडवर आली आहे. इंग्लंडचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असताना त्यांचे अनुभवी वेगवान गोलंदाजही निष्प्रभ ठरल्याने इंग्लंडच्या अडचणीत भरच पडली. तसेच कर्णधार म्हणून ज्यो रूट सफसेल फेल गेला आहे. या दौऱ्यातील उर्वरीत दोन सामन्यात इंग्लंडकडून प्रतिकाराची कोणतीही शक्यता दिसत नसून मालिका पाच -शुन्य अशी गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर येऊ शकते. त्याचबरोबर ज्यो रुटच्या कर्णधारपदावरही यंदाची संक्रांत येणार हे जवळजवळ निश्चितच म्हणावे लागेल.

       इंग्लंडने या वर्षी भारतात तीन - एक व मायदेशात भारताविरूध्द दोन - एक अशी मालिका गमावली आहे. शिवाय न्यूझिलंड विरूध्द ही मायदेशात एक -शुन्य असा पराभव इंग्लंडच्या पदरी पडला होता. या वर्षात इंग्लिश कर्णधार ज्यो रुट वगळता इतर कोणत्याही फलंदाजाची बॅट तळपली नाही. शिवाय एका वर्षात सर्वाधिक चोपन्न फलंदाज शुन्यावर बाद होण्याच्या स्वतःच्याच विक्रमाशी इंग्लंडने यंदा बरोबरी साधली आहे. शिवाय ऑस्ट्रेलियात सलग तेरा सामने हरण्याची नामुष्की इंग्लंडवर आली आहे. इंग्लंडचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असताना त्यांचे अनुभवी वेगवान गोलंदाजही निष्प्रभ ठरल्याने इंग्लंडच्या अडचणीत भरच पडली. तसेच कर्णधार म्हणून ज्यो रूट सफसेल फेल गेला आहे. या दौऱ्यातील उर्वरीत दोन सामन्यात इंग्लंडकडून प्रतिकाराची कोणतीही शक्यता दिसत नसून मालिका पाच -शुन्य अशी गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर येऊ शकते. त्याचबरोबर ज्यो रुटच्या कर्णधारपदावरही यंदाची संक्रांत येणार हे जवळजवळ निश्चितच म्हणावे लागेल.         

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close