shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रिकेटच्या खेळातून सार्वजनिक जीवनात जगण्याचे धडे मिळतात - तहसीलदार प्रशांत पाटील..!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख):-  येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन शैक्षणिक संकुलामध्ये लेदर बॉल क्रिकेट प्रिमियर लीगचे भव्य उदघाटन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याहस्ते झाले,
खेळ आणि जीवन यांची सांगड कशी घालावी तसेच क्रिकेटच्या खेळातून सार्वजनिक जीवनात जगण्याचे धडे कसे मिळतात हे विद्यानिकेतन प्रिमियर लीग उदघाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.


         या प्रसंगी संस्थेचे खजिनदार डॉ.राजीव शिंदे,चेअरमन टी. ई. शेळके,व्हा.चेअरपर्सन डॉ.प्रेरणा शिंदे,इंजि.विलासराव जगधने, डॉ.बाबुराव उपाध्ये,शंकरराव गागरे ,प्राचार्य विनोद रोहमारे, सौ.रंजना जरे, विविध शाळेतील खेळाडू ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.
विद्यानिकेतन प्रिमियर लीगमध्ये एकूण आठ संघाने भाग घेतलेला आहे.पहिल्या दिवशी दिवसभरात चार सामने झाले, सर्व सामने दहा षटकाचे खेळवण्यात आले. पहिला सामना राईडर्स  विरुद्ध  चॅम्पियन यांच्यात झाला.या सामन्यात चॅम्पियन हा संघ विजयी झाला.या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुरज शेलार याला सामनावीर या पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसरा सामना हिरो व वॉरियर्स यांच्यात झाला. त्यामध्ये वॉरियर्स हा संघ विजयी झाला.श्रेयान बोरावके हा सामन्यात सामनावीर ठरला. तिसरा सामना फायटर विरुद्ध चालेंजर यांच्यात झाला.या सामन्यात चालेंजर हा संघ विजयी झाला. 

विजय खेचून आणणाऱ्या कृष्णा बोंबले याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.चौथा सामना स्ट्राईकर्स व स्पार्टान्स यांच्यात झाला. या सामन्यात स्पार्टान्स संघ विजयी झाला. दर्श खंडागळे याला विजयाचे शिल्पकार घोषित करून सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.सर्व विजयी संघाचे व खेळाडूचे अभिनंदन करण्यात आले.पंच म्हणून कासार सर,काजी सर,नवले सर,महाडिक सर,प्रसन्न बोंबले यांनी काम पाहिले.प्रिमियर लीग यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक अमोल गिरमे,दत्ता महाडिक, ऋषकेश नवले,प्रवीण कुदळे आदी परिश्रम घेत आहेत.
close