shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमगाव केतकी येथील बँक ए.टी.एम आणि पतसंस्थेच्या सुरक्षे संदर्भात खबरदारीचे उपायसाठी निमगाव केतकी पोलीस चौकी येथे बँक व पतसंस्था चेअरमन व सचिवांची बैठक संपन्न.

     निमगाव केतकी येथील बँक  ए.टी.एम आणि पतसंस्थेच्या सुरक्षे संदर्भात खबरदारीचे उपायसाठी निमगाव केतकी पोलीस चौकी येथे बँक व पतसंस्था चेअरमन व सचिवांची बैठक संपन्न.  
  इंदापूर प्रतिनिधी:    जुन्नर येथील धाडसी दरोड्या नंतर खाबरदारीचे उपाय म्हणुन निमगाव केतकी येथील बँक  ए.टी.एम आणि पतसंस्थेच्या सुरक्षे संदर्भात इंदापुर पोलिस निरिक्षक तय्युब मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रेय लिगाडे  यांनी बँकेच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी बँक मॕनेजर , ए.टी.एम चालक , पत संस्था चेअरमन यांची मिटींग घेऊन उपाय योजनेच्या बाबत सुचना दिल्या.
 

          यावेळी बँक व संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना पोलिस उपनिरिक्षक लिगाडे म्हणाले कि ,प्रत्येक बँक , ए.टी.एम.करीता एक हत्यार बंद सुरक्षा कर्मचारी व सेंट्रल अलार्म सिस्टीम बसवावी. 

बँकेत व ए.टी.एम येथे सी.सी.टी.व्ही. सर्वेलंन्स सिस्टीम संपुर्ण परिसर व पार्कींग तसेच बँक व ए.टी.एम. समोरिल रास्ता निदर्शनास येईल अशा प्रकारे बसवावेत. सी.सी.टी.व्ही यंत्रणा २४ तास चालु असावी.त्याचा डी.व्ही आर सुरक्षित ठिकाणी बसवुन त्याचा ३० दिवसाचा बॕकअप हा सुरक्षित राहील या पद्धतीचा असावा.

     बँकेच्या किंवा पतसंस्थेत एखादा संशयीत आढळला तर पोलिस स्टेशनला किंवा ११२ नंबरशी संपर्क करावा.पोलिस व्हीजीट बुक ठेवण्यात यावेत.तसेच या नियमांचे पालन बँक व पतसंस्थांनी पालन न केल्यास व भविष्यात काही घटना घडल्यास त्या बँकेचे व पतसंस्थेचे मॕनेजर जबाबदार असतील असे सांगुन या सुचनांची पुर्तता १५ दिवसात पुर्ण कराव्यात असे  म्हणाले .


श्री   केतकेश्वर पतसंस्थेचे चेअरमन गोरख आदलिंग यांचे सह सर्व पतसंथांचे सचिव उपस्थित होते.



close