शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
कोपरगाव । प्रतिनिधी :
सिन्नर ते शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० ए वर सावळीविहीर फाटा येथे उड्डाण पुलाचे काम काही महीन्यांपासून कासवाच्या गतीने प्रगती पथावर आहे...
त्या ठिकाणी पुलाच्या दोन्ही बाजूने साईड गटार शेजारी रस्ता बनवण्यासाठी खोदकाम करण्यात आले.. सदर खोदकाम मुरूम अथवा खडीने भरायचे असताना अधिकार्यांच्या आशिर्वादाने ठेकेदाराने चक्क माती टाकून भरण्याचे काम चालू केलेले आहे.
आज सदरच्या साईट वर जाऊन मातीच्या भराव्याला फुलं व हार वाहून सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पुजा केली ..! राहाता व कोपरगाव तालुक्याच्या सिमेवर हे निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्यामुळे दोन्ही लोक प्रतिनिधींना लक्ष देण्यास अथवा आवाज उठविण्यास वेळच मिळत नाही...!
जर रस्त्याच्या पायात माती ओतली तर रस्त्याचा पाया निकृष्ट होणार व नगर मनमाड रस्त्याची औदसा लवकरच त्याला प्राप्त होणार.. यात शंका नाही.
सदरचा रस्ता निकृष्ट करण्याचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक व विभागिय अधिकारी सामिल असल्याची कुजबूज साईट वर ऐकिवात येत आहे.. ठेकेदाराचे कर्मचारी सदर विषया संदर्भात बोलत असल्याचे कळते. हे अधिकारी ठेकेदारांच्या (एजन्सीच्या) खिशात आहेत.
मग नामदार नितीन गडकरी कितीही ओरडले भारताचे दळण वळण सुधारणार.. तर मग अशा निकृष्ट रस्त्याच्या कामाने कसे सुधारणार... सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांची मागणी आहे की,ठेकेदाराने माती उचलावी व त्याठिकाणी मुरूम खडीचे मिश्रण टाकावे..!
ठेकेदाराला निकृष्ट कामाला साथ देणाऱ्या प्रकल्प संचालक व विभागीय अधिकारी राष्ट़्रीय महामार्ग यांचेवर सक्त कारवाई व्हावी.. कामे गुणवत्तेत झालीच पाहीजे, अन्यथा मला जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन करावे लागेल असे संजय भास्करराव काळे यांनी शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह शी बोलताना व्यक्त केले आहे.

