इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधील नेहा चौगुले बजाज ऑटो लिमिटेड मध्ये निवड झाल्याबद्दल आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज मधील तृतीय वर्षामध्ये शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेड मध्ये निवड झाली असून सात पैकी इंदापूर शहरातील बाबा चौक येथील कु. नेहा मनोज चौगुले या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून निवड झाल्याने व आई वडिलांचे कष्टाचे फळ प्राप्त करून दिल्याबद्दल आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार यांनी (दि.१६) रोजी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी अनिल पवार म्हणाले की, शैक्षणिक कार्यासाठी माझ्या कडून शक्य होईल तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन, आपल्या या यशस्वी ते बद्दल मी व माझ्या मित्र परिवाराकडून शुभेच्छा व्यक्त करून अभिनंदन करतो आणि नेहा चौगुले यांच्या निवडीबद्दल तिचे आई वडील व निवड करणारे बजाज ऑटो लिमिटेड मधील विकास शुक्ला व प्रियंका जगताप व विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार वीर व शिक्षक वृंद यांचेही अभिनंदन करून आभार मानतो.
यावेळी रोहिदास पवार, चेतन चौगुले किरण पवार महादेव चौगुले, अनिल चौगुले,वडील मनोज चौगुले, प्रमिला चौगुले, भाऊ निखिल चौगुले इत्यादी उपस्थित होते.
गरिबीतून कुटुंबातील नेहा चौगुले या विद्यार्थिनीची निवडी झाल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील सर्व स्तरातून अनेक मान्यवरांकडून अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

