जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापूरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त
विनम्र अभिवादन..
इंदापूर प्रतिनिधी: आज संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असून वडापूरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षण समितीचे अध्यक्ष गणीभाई मुलांनी यांच्या हस्ते करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी वडापुरी गावचे उपसरपंच विठ्ठल कदम, मुख्याध्यापिका रजिया शेख, सहशिक्षक श्याम सुंदर माने, शिक्षिका मनिषा मोरे, प्रतिभा गरकळ, ग्रामस्थ संतोष पासगे, अंगणवाडी मदतनीस सारिका मोटे, माधुरी कदम तसेच इतर ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

