पुणे जिल्हा बँकेच्या इंदापूर तालुका प्रतिनिधी' अ 'वर्ग सोसायटी प्रतिनिधी मतदारसंघातून अप्पासाहेब जगदाळे यांनी भरला अर्ज.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती भरला अर्ज.
इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी' अ 'वर्ग मतदारसंघातून आज ६ डिसेंबर २०२१ रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला .पुणे जिल्हा बँकेच्या निवडणूक कार्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी पृथ्वीराज जाचक, विलासराव वाघमोडे,उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, मुरलीधर निंबाळकर, कृष्णाजी यादव, मोहन दुधाळ, देवराज जाधव ,मारुती वनवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या १९ वर्षांपासून अप्पासाहेब जगदाळे यांचे बँकेवर निर्विवाद वर्चस्व आहे. इंदापूर 'अ 'वर्ग प्रतिनिधी सोसायटी मतदार संघातून १८५ मतदार प्रतिनिधी आहेत. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांचे वर्चस्व दिसून येते.

