बहरावी अभयारण्ये चौफेर
देशी झाडांची निवड करू,
जपण्यासाठी अन्नसाखळी
योग्य रोपांची लागवड करू,
देऊन पाणी रोपांना
मोठे पिंपळ आणि वड करू,
वाण विदेशी काही निरुपयोगी
त्यांची आता परवड करू,
फुले विषारी वासांची
सैल त्यांची पकड करू,
वाढवू मोर नि इतरही पक्षी
प्रसंगी पदरमोड करू...!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रचना : दीपक महाले,
शिरूर कासार.
मो. 9823384909..

