shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शांत बसून कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर त्यासाठी आवाज उठवला पाहिजे - सौ. रूपालीताई चाकणकर. राज्य महीला आयोग अध्यक्षा.पुणे येथे माळी सेवा संघाचा प्रथम वर्धापन दिनी समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मान पुरस्काराने सन्मानित.

शांत बसून कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर त्यासाठी आवाज उठवला पाहिजे - सौ. रूपालीताई चाकणकर. राज्य महीला आयोग अध्यक्षा.

पुणे येथे माळी सेवा संघाचा प्रथम वर्धापन दिनी समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मान पुरस्काराने सन्मानित.

कै. पारूबाई बबन बोराटे यांच्या स्मरणार्थ सन्मान पुरस्कार सोहळ्याचे वितरण.

माळी सेवा संघाचा आधारस्तंभ व राज्य महिला आयोग अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सौ.रूपालीताई चाकणकर यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: आपल्याला शांत बसून कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर त्यासाठी आवाज उठवला पाहिजे.संघर्ष केला पाहिजे. सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन ओबीसी आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी माळी सेवा संघाच्या प्रथम वर्धापन दिन आयोजित पुणे येथील समारंभातील भाषणात (दि.८) रोजी त्या बोलत होत्या.
दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर पुणे येथे माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी कै.पारूबाई बबन बोराटे यांच्या स्मरणार्थ सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
 संघटनेच्या वतीने आयोजित सन्मान पुरस्कार राजेंद्र गिरमे, अर्चनाताई फुलसुंदर,पोपटराव बोराटे, गोविंदराव शिरवाडकर, डॉ.नितीन शिंदे, त्रृतुराज गायकवाड यांना देण्यात आले.

 त्यावेळी माळी सेवा संघाच्या आधारस्तंभ व महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांचा संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तसेच सौ रुपाली ताई चाकणकर, माजी महापौर वैशाली घोडेकर, राज्य संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ माळी ,उपाध्यक्ष बालाजी माळी, सचिव सचिन राऊत, उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव, बालाजी वहिल ॲड. नितीन राजगुरू, महेश गोरे, मुरलीधर भुजबळ, सौ उर्मिलाताई भुजबळ तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर यांच्या  उपस्थित पुरस्कारार्थी  मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ रुपाली ताई चाकणकर म्हणाल्या की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माझा या समारंभामध्ये सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने माळी सेवा संघाच्या राज्यभरातून उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांवर सोबत संवाद साधता आला याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. या संघाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण जे मी करू शकले नाही ते दत्ताभाऊ माळी यांनी सेवा संघाचे संघटन करून केले आहे. संघटनेच्या वर्धापन दिनी आईच्या स्मरणार्थ सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करून रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती जवळची असतात हे आज दत्ता भाऊ माळी यांनी त्यांच्या कार्यतून जाणीव करून दिली. माळी सेवा संघ कार्यकारिणी एवढी आहे की पत्रिकेमध्ये नाव लिहायला जागा शिल्लक नाही. यावेळी ओबीसी आरक्षणाविषयी चाकणकर म्हणाल्या की, आपल्याला शांत बसून कुठलीही गोष्ट मिळत नसेल तर त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. सर्व समाज बांधवांनी आवाज उठवला पाहिजे एकत्रित आले पाहिजे. खरंतर संघटनेचे कामाचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे.संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे  कामे घेऊन या काम नक्कीच मार्गी लावू  . मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेच्या वतीने सत्कार स्वागत केले जाते हे संघाचे विशेष यश आणि कौतुक आहे.
यावेळी संत शिरोमणी सावता महाराजांचे १६ वे वंशज रमेश महाराज वसेकर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेच्या पदाधिकारी आहे. आपल्या संघटनेचा असाच नावलौकिक व्हावा हीच सावता महाराजांच्या  चरणी प्रार्थना करतो.

माळी सेवा संघाचे राज्य अध्यक्ष दत्तात्रयभाऊ माळी म्हणाले की,एक ध्येय होतं विखुरलेल्या समाजातील लोकांना एकत्र आणून संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवुन काम करायचं. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचा जागर सुरू केला. त्यातुन शिक्षित झालेल्या महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. वर्षानुवर्षे अन्याय-अत्याचार सहन करत स्वतःच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असलेल्या समाजबांधवांना सहकार्याचा हात देता यावा यासाठी "माळी सेवा संघाची" स्थापना करण्याचा मानस होता.पुण्यात एक रोपटे लावले होते.त्याच्या वट रुक्ष झाल्याचा पाहावयास मिळत आहे. त्यानुसार राज्यभर विविध क्षेत्रांमधील समाजबांधवांना एकत्र करुन त्यांनी वर्षभरामध्ये चांगले संघटन उभे केले आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे भविष्यामध्ये होतील याची मला खात्री आहे.
लीगल सेलचे अध्यक्ष नितीन राजगुरू म्हणाले की, समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून होत आहे व ते अधिक पटीने करण्याचा प्रयत्न सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत करू.
संघटनेच्या महिला अध्यक्षा उर्मिला ताई भुजबळ म्हणाले की रूपाली ताईंचा डोळ्यापुढे आदर्श ठेवून महिलांना सक्षमीकरण करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करत आहोत.

उपाध्यक्ष बालाजी माळी म्हणाले की संघटनेमध्ये लहान आणि मोठा असा कधी भेदभाव केला जात नाही सर्वांना समान न्याय दिला जातो त्यामुळे आमच्या संघटनेचे काम प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावांमध्ये पोहोचत आहे.

प्रास्ताविक भाषणांमध्ये बापूसाहेब बोराटे म्हणाले की माळी सेवा संघ संघटनेचे महाराष्ट्र मध्ये काम चांगल्या पद्धतीने चालू आहे.  संघटनेची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत असून तळागळातील व्यक्ती पर्यंत पोचून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सर्व पदाधिकारी यांना सामावून घेत प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे कार्य करेल.

    यावेळी वैशालीताई घोडेकर, ज्ञानदेव जाधव , नंदाताई भुजबळ, वर्षाताई भोंग, यांनी ही मनोगत व्यक्त केले.

      यावेळी डी.वायएसपी काशिनाथ तळेकर,  दशरथ कुळधरण, अर्जुन गरूड, विकास अभंग, सतिशशेट खुणे,सचिन अनंतकवळस, संदीप फुलसुंदर, संतोष शिंदे, ज्ञानदेव शेंडे, डॉ.उत्तमराव जाधव, पल्लवी भागवत,अनिता शिंदे,रवि माळी, ममता शिंदे ,अनिता राऊत, रमेश गणगे, शकुंतला शिंदे, सचिन गायकवाड, पुष्पा कुदळे, कल्पेश पाटील, सौ. शामा जाधव, प्रभा करपे, मीनाक्षीताई बोराटे, रामा भोसले, तसेच माळी सेवा संघ प्रदेश, विभागीय, जिल्हा, तालुका, शहर,व ग्रामीण भागातील पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा प्रभारी व इंदापूर तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवर व महाराष्ट्रातून उपस्थित राहिलेले संघटनेचे पदाधिकारी यांचे आभार नानासाहेब ननवरे यांनी मानले.
close