shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विखे पाटलांना खरमरीत टोला ; रात्रीतून पक्ष बदलणारे नेते..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१

विखे पाटलांना खरमरीत टोला ; रात्रीतून पक्ष बदलणारे नेते..!!

राहाता : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका हा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजला जातो. या राहाता तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आपले वर्चस्व निर्माण करू पाहत आहे.

       या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजीव भोर यांनी महत्त्व वक्तव्य बाभळेश्वर (ता. राहाता) येथे केले.खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाभळेश्वर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील होते.

       स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर घेण्यात आले. श्रीरामपूर दूध जिल्हा संघाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के यांच्या विशेष पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिराला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
        ते पुढे म्हणाले, की रात्रीतून पक्ष बदलणारे काही नेते या तालुक्यात आहेत. त्यांची धनशक्ती, दडपशाही व हुकूमशाही आपल्याला टिकू देईल का. पक्ष आपल्याला संरक्षण देईल का असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला न्यूनगंड दूर करावा लागेल.

   गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, पारनेर, कर्जत-जामखेड तालुक्यात परिवर्तन झाले. राहाता तालुक्यातही त्याची पुनरावृत्ती होईल.अरुण कडू म्हणाले, पंडित नेहरू व महात्मा गांधींप्रमाणेच दुर्दैवाने शरद पवारांचीही प्रतिमाभंजन करण्याचे काम काही शक्तींकडून सुरू आहे. त्याला तशाच प्रकारे प्रत्युत्तर देण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. पवारांचे राजकीय, सामाजिक व विकासात्मक पैलू जनतेपुढे न्यावे असे कडू म्हणाले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close