shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा. मुकूंद बाबसाहेब गुंड यांना क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१.

प्रा. मुकूंद बाबसाहेब गुंड यांना क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..!!        

राहुरी : क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर यांचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक ८/१२/२०२१ रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृह, कोल्हापूर येथे पार पडला. या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री. मा. राजू दिंडोरले, नगरसेवक, कोल्हापूर होते तर मा. श्री. विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, कोल्हापूर , मा. प्रा. प्रकाश नाईक, उपाध्यक्ष, समतावादी चळवळ, महाराष्ट्र, श्री. विशाल मोरे, अध्यक्ष, क्रांतीसुर्य फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या प्रमूख उपस्थिती आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
    
        क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म २८ नोव्हेंबर दिवस हाच शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमूख वक्ते श्री. प्रकाश नाईक यांनी केले. महाराष्ट्रातून अध्यापनाचे पवित्र काम करण्याव्यतिरि्त आपण समाजाचे काही देणे लागतो हा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर ने संपूर्ण महाराष्ट्रातून मागवले होते त्यात प्रा. मुकूंद बाबसाहेब गुंड, सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयं कोल्हापूर येथे कार्यरत असलेले व राहुरी खुर्द गावचे रहिवाशी यांना राहुरी व कोल्हापूर येथे केलेल्या सामजिक कार्यासाठी दिनांक -८/१२/२०२१ रोजी मा. श्री. राजू दींडोरले, नगरसेवक, कोल्हापूर यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. हर्षदा परीट यांनी केले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close