shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन बावडा येथे संपन्न.राष्ट्रवादीकाँग्रेस पुणेजिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन बावडा येथे संपन्न.
राष्ट्रवादीकाँग्रेस पुणेजिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते  उद्घाटन.
इंदापूर प्रतिनिधी:समाजातील गोरगरीब उपेक्षित लोक,निराधार ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांची सेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप दादा गारटकर यांनी सांगितले.बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसद महारत्न खासदार माननीय सौ. सुप्रियाताई सुळे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रीमंत्री मा.दत्तात्रय  भरणे यांचे विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन आज बावडा गावामध्ये करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत बापू पाटील,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे-पाटील,कार्याध्यक्ष अतुल झगडे,बावडा सोसायटीचे मा.व्हा.चेअरमन विजय घोगरे,मा.जि.प.सदस्य बाळासाहेब करगळ,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर,संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ,राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडळसकर,अजित टिळेकर राष्ट्रवादी किसान सभेचे मा.तालुकाध्यक्ष तुकाराम घोगरे, बावडा सोसायटीचे संचालक विद्यासागर घोगरे,युवा नेते रविराज घोगरे,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,पिंपरी चे सरपंच श्रीकांत बोडके,बावडा सोसायटीचे संचालक अभिजीत घोगरे,युवा नेते संग्रामसिंह पाटील,अनंतराव पवार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रणजीत घोगरे,बावडा सोसायटीचे संचालक जालिंदर गायकवाड, गिरवीचे सरपंच पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासो क्षिरसागर,श्रीकांत दंडवते,नरसिंहपूरचे मा.उपसरपंच विठ्ठल देशमुख,चाकाटीचे सरपंच संजय रुपनवर, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष अमोलराजे मोहिते,नागेश गायकवाड राष्ट्रवादी युवतीच्या तालुकाध्यक्ष अश्विनी कुर्डे,सुनिल पालवे,महावीर जगताप,विक्रांत घोगरे,विक्रम घोगरे, जिग्नेश कांबळे,पांडुरंग कांबळे,सतीश कांबळे,बाळासाहेब भोसले किशोर शिंदे,अस्लम मुलाणी, जालिंदर भिसे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रदीपदादा गारटकर यांनी सांगितले की, समाजातील उपेक्षित घटक, गोरगरीब सर्वसामान्य जनता व वयोवृद्ध तसेच दिव्यांगांना खऱ्या अर्थानं आपल्या मदतीची गरज असते,आपण केलेल्या छोट्याशा मदतीमुळे त्यांच्या जीवनाला थोडा का होईना पण आधार मिळत असतो या भूमिकेतूनच आपण आदरणीय सुप्रियाताई सुळे व आदरणीय दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये अशा शिबिरांचे आयोजन केले आहे.या शिबिरामुळे गरजूंना निश्चितपणे मदत होत असून,या दिनदुबळ्या बांधवांना मदत करणे म्हणजेच ईश्वर सेवा करण्यासारखे आहे.सामाजिक जिवनामध्ये वावरत असताना एकमेकांना आनंद द्यायचा आणि आनंद घ्यायचा या वृत्तीतून गरजूंना मदत केल्यामुळे आपल्याला सुद्धा निश्चितपणे समाधान मिळत असते,त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवाभावी भावनेतून गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना या शिबीराचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
close