शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०८ डिसेंबर २०२१
पुणे येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या..!!
पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तापस केला आहे.
समीर मनूर शेख असं हत्या झालेल्य तरुणाचं नाव आहे. हा हल्ला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. प्रचंड वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून त्यांचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक समीर मनूर शेख याने आरोपी मेहबूब बलुर्गी या आपल्या मित्राकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते. मृत समीर याने यातील अडीच लाख रुपये मेहबूबला परत दिले. पण उरलेले पैसे देण्यासाठी मात्र समीर टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे मृत समीर अंगावर भरपूर सोनं घालून परिसरात 'गोल्डमन' बनून फिरतो. पण आपले अडीच लाख रुपये देत नाही. यामुळे मेहबूबचा समीरवर राग होता.यातूनच संतापलेल्या मेहबूब याने दोन महिन्यांपूर्वी समीरची गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला. यातूनच मेहबूब याने समीरचा पाठलाग करून त्याला भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपीनं समीरला पाठीमागून पकडून जवळून 6 गोळ्या घालल्या आहेत. भरदिवसा गोळ्या घालून व्यावसायिकाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहबूबला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

