इंदापुरातील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान सांस्कृतीक ऐक्याचे प्रतिक ग्रामदैवत .ह. चांदशाहवली बाबांचा उरूस .
दि. ११ , १२ व १३ डिसेंबर २०२१ रोजी होणार साध्या पद्धतीने साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापुरातील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान सांस्कृतीक ऐक्याचे प्रतिक ग्रामदैवत .ह. चांदशाहवली बाबांचा उरूस दि. ११ , १२ व १३ डिसेंबर २०२१ रोजी होणार साध्या पद्धतीने साजरा.या उरुसाचे यंदाचे ४५७ वे वर्ष आहे या वर्षी कोरोनाच्या परिस्थीतीमुळे साध्या पध्दतीने साजरा होणार असून ट्रस्टचे विश्वस्त जाफरभाई मुलाणी, मुनीर मुजावर, शकिल मुजावर, महामुद मुजावर उरूस कमीटीचे अध्यक्ष आझाद पठाण ,उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर ,मा . नगरसेवक शेरखान पठाण व संदलचे मानकरी हमीदभाई आत्तार यांची संयुक्त बैठक झाली . त्यामध्ये बाबांचा उरूस साध्या पध्दतीने करण्याचे ठरले .
बाबांचा उरूस तीन दिवस साजरा केला जातो . उरुसाची सुरुवात ही संदल , गलफ व फुलांची चादर विधिवतअर्पण करून होते .परंपरेनुसार संदल बनवण्याचा मान दर्गाहचे मानकरी हमीदभाई आत्तार यांचे घराण्याकडे आहे . तर गलफ व चादर अर्पण करणेचा मान हा इदापूर पोलीस स्टेशनचा आहे गलफ व फूलांची चादर इंदापूर घेऊन पोलीस स्टेशनमधून निघून मूख्य बाजारपेठेतून येते व पुढे हमीदभाई आत्तार यांचे घरातून परंपरेनुसार संदल घेऊन दर्गाह यांचेकडून येतात . त्यानंतर धार्मिक विधी होऊन परंपरेनुसार संदल , गलफ व फुलांची चादर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांचे हस्ते अर्पण केली जाते. त्यानंतर मुख्य ऊरुसास सुरुवात होते .
दुसरा दिवस हा मुख्य उरूसाचा असतो यावेळी इंदापूरच्या पंचक्रोशीतील सर्व धर्मातील भाविक सहकुटुंबा समवेत दर्शनासाठी येतात .यावेळी बाबांना मलिदा व नारळ प्रसाद म्हणून दाखवला जातो .
तिसरा दिवस :
या दिवशी सकाळी ८ .३० वाजता जियारत हा धार्मिक विधी असतो आणि सायंकाळी ८ वाजता बाबांच्या झेंडयाची ग्राम प्रादिक्षणा शोभेचे दारूकाम व आतीषबाजीत सूरुवात होते .झेंडयाचे मानकरी मुनीर बेपारी आहेत .यावेळी हजारो भाविक झेंडयाचे दर्शन घेण्यासाठी व नारळाचे तोरण बांधण्यासाठी उपस्थित असतात दर्शन वेळी बाबांच्या झेंड्यावर रेवड्यांची उधळण केली जाते . ग्राम प्रदिक्षणेनंतर धार्मिक विधी होऊन उरुसाची सांगता होते .

