shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शहीद सीडीएस बीपीन रावत यांच्यासह जवानांना इंदापूर येथे शहीद स्मारक या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करुन वाहिली श्रद्धांजली.इंदापूर तालुका सर्व माजी सैनिक युवा क्रांती प्रतिष्ठाण व विविध संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली.

शहीद सीडीएस बीपीन रावत यांच्यासह जवानांना इंदापूर येथे शहीद स्मारक या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करुन वाहिली श्रद्धांजली.

इंदापूर तालुका सर्व माजी सैनिक युवा क्रांती प्रतिष्ठाण  व विविध संघटनेच्या वतीने वाहिली श्रद्धांजली.
इंदापूर प्रतिनिधी:सी. डी. एस.जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १४ जणांना घेऊन जाणारे हवाई दलाचे हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये अपघात ग्रस्त झाले. ज्यामध्ये बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जवानांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची बातमी मिळताच देशभरात शोककळा पसरली आहे.   देशाचे पहीले सीडीएस (चीफ आॕफ डिफेन्स स्टाफ) जनरल बीपीन रावत यांच्यासह  सर्व शहिदा जवानांना आज संपूर्ण देशात सर्वस्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्याच बरोबरआज (दि.१०) इंदापूर तालुक्यातील सर्व माजी सैनिक व विविध संघटनेच्या वतीने इंदापूर शहरातील शहीद स्मारक या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी इंदापूर तालुक्यातील मेजर कैलास गवळी, तानाजी मोरे ,राजाराम गलांडे, मेजर व संपादक विलासराव गाढवे ,बजरंग चंदनशिवे, रविराज पवार ,बाजीराव शिंदे ,दादासो बरकडे ,गलांडे मेजर मधुकर खिलारे, मंगेश जाधव, जय नर्सिंग कॉलेज चेअरमन नायकुडे सर  ,, श्रीमती बोराटे मॅडम, श्रीमती जैन मॅडम, मेजर मनोज बारटक्के इत्यादी माजी सैनिक तसेच इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कापरे, बँक मॅनेजर महाराष्ट्र  साहेब, एलआयसी ऑफिसर किशोर वानखेडे, युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत शिताप तसेच संपादक धनंजय कळमकर,प्रदीप पवार , दशरथ भोंग  ,पोपट शिंदे ,रमेश राऊत  पियुष बोरा  इत्यादी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आणि देशभक्तीपर घोषणा दिल्या.
close