shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक ,राजकीय , व्यवसायिक क्षेत्रासह मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच भरतशेठ शहा.भरतशेठ शहा यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.

सामाजिक ,राजकीय , व्यवसायिक क्षेत्रासह मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजेच भरतशेठ शहा.

भरतशेठ शहा यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरात वास्तव्यास असणारे शहा कुटुंब या  कुटुंबात गेली तीन-चार पिढ्या पासून सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कुटुंबातील वै. सुरेशदास शहा व मालतीताई शहा यांचे सुपुत्र भरत शहा यांचा जन्म १० डिसेंबर १९६९ रोजी झाला.
त्यांचे पदवीधर शिक्षण इंदापुर मध्ये झाले. एल .एल. बी.  पुणे या ठिकाणी पूर्ण केले.
त्यांना आजोबा पासून सामाजिक , व्यवसाय क्षेत्रातील गाढा अनुभव लहानपणापासूनच मिळाला.  प्रत्येकाशी संवाद साधताना नैसर्गिक रित्या मिळालेली हसतमुख देणगी ही भरत शहा यांची ओळख निर्माण करणारी खास शैली. त्यांच्या याच शैलीने  सर्व स्तरातील त्यांना मित्रांचा सहवास लाभला आणि आज मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांची ओळख ही दिसत आहे.त्यांनी अनेक क्षेत्रात मित्रत्व वाढवत   सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांना रक्त ताबडतोब मिळावे या हेतूने इंदापूर मध्ये नारायणदास रामदास रक्तपेढी ट्रस्ट मार्फत हजारांचे प्राण वाचवले. तसेच मारुती मंदिर ट्रस्टच्यावतीने अनेक सामाजिक ,धार्मिक उपक्रम राबून सर्वधर्मसमभावना ठेवून आपल्या परीने माणुसकी जपण्याचा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे प्रयत्न केला आणि सामाजिक कृतिशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी अनेक कुटुंबाच्या सुख-दुःखात सामील होऊन त्या कुटुंबातील एक सदस्य असल्याचेही त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. यातूनच ते राजकीय क्षेत्रामध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अर्बन बँक संचालक ते चेअरमन पद भूषवले तसेच कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे गेली पाच वर्ष संचालक आणि सध्या विद्यमान व्हॉइसचेअरमन म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. इंदापूर नगरपालिकेमध्ये पाच वर्ष उपनगराध्यक्ष पद भूषवले तसेच गेली पाच वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातील अंकिताताई मुकुंद शहा या गेली पाच वर्ष नगराध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळत असताना इंदापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा दिसून आला. अशा या सामाजिक राजकीय आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असणारे भरतशेठ शहा यांच्या भरभराटी मध्ये त्यांचे आदर्श एकत्रित सहकुटुंब सहपरिवार म्हणून नावलौकिक असणाऱ्या कुटुंबात बंधू मुकुंदशेठ शहा, भाऊजय अंकिताताई मुकुंद शहा तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली शहा व त्यांचे बंधू अमेरिकेत  मध्ये आहेत असे भावेश शहा आणि शहा परिवारातील लहान थोरांचा सहभाग अतिशय मोलाचा आहे. भरत शहा यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त त्यांना त्यांच्या मित्र परिवार व त्यांच्या चाहत्यांच्या मार्फत मिळणाऱ्या शुभेच्छातून त्यांच्यावर असणारे प्रेम आणि समाजातील कार्यकुशलनेतृत्व सिद्ध होते.
close