shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिमालया एवढ्या उंचीचामहाराष्ट्राचा आधारवड असणाऱ्या शरद पवारसाहेब यांना उदंड दीर्घायुष्य लाभो - ना. दत्तात्रय भरणे.इंदापूर येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा अभिष्टचिंतन दिन तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा.

हिमालया एवढ्या उंचीचा
महाराष्ट्राचा आधारवड असणाऱ्या शरद पवारसाहेब यांना उदंड  दीर्घायुष्य लाभो - ना. दत्तात्रय भरणे.

इंदापूर येथे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार  यांचा  अभिष्टचिंतन दिन तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा.
 इंदापूर प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,माजी केंद्रीय कृषिमंत्री  खा. शरदचंद्रजी पवार हे सबंध देशाचे प्रेरणास्थान असून आपल्या सर्वांचे ऊर्जास्त्रोत आहेत.अशा हिमालया एवढ्या उंचीचा महाराष्ट्राचा आधारवड असणाऱ्या शरद पवार यांना उदंड आणि दीर्घायुष्य लाभो,अशा शुभेच्छा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दि.१२ डिसेंबर रोजी इंदापूर येथे दिल्या.

खा.शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे (मुंबई येथील अभिष्टचिंतन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण)आयोजन करण्यात आले होते, यामध्ये राज्यमंत्री भरणे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर,पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पंचायत समिती सदस्य सतिश पांढरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य कालिदास देवकर,बाळासाहेब करगळ,मार्केट कमिटीचे संचालक शिवाजी ईजगुडे,सचिन देवकर,माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे,माजी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, तानाजीराव हांगे,मा.कार्याध्यक्ष अमोल भिसे,छगनबापू तांबिले,किसनराव जावळे,राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे , नवनाथ रूपनवर,राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, युवती तालुकाध्यक्ष अश्विनी कुर्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे ,अनिल राऊत,पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील,तुकाराम गोलांडे,ॲड.भारत जगताप,खरेदी-विक्री संघाचे मा.चेअरमन अशोक चोरमले,सहकार बोर्डाचे संचालक रतन हेगडे,रेहना मुलाणी,सेवादलाचे अध्यक्ष दत्तात्रय मोरे,सोशल मिडीया अध्यक्ष हामा पाटील, भटके-विमुक्त सेलचे अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे,जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पवार,खरेदी-विक्री संघाचे संचालक साहेबराव चोपडे,नगरसेवक अनिकेत वाघ,पोपट शिंदे,अशोक मखरे ,अतुल शेटे-पाटील,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,दादासाहेब सोनवणे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा उमाताई इंगोले,कार्याध्यक्षा स्मिताताई पवार,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना भरणे म्हणाले की, या देशाच्या इतिहासामध्ये सलग पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ आपली संसदीय कारकीर्द गाजवणारे एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत याचा निश्चितपणे अभिमान आपल्या सर्वांना असून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये तसेच सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्नांची कष्ट करून आपला महाराष्ट्र समृद्ध आणि प्रगतीपथावर पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने आदरणीय पवार साहेब मेहनत घेत असतात.आदरणीय साहेब आज आपल्या ८१ व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यांचा आत्मविश्वास,सातत्याने विकासाचा ध्यास आणि अफाट इच्छाशक्ती पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना सुद्धा निश्चितपणे एक प्रेरणा मिळत असते.आज सुद्धा देशाच्या राजकारणामध्ये आदरणीय साहेब नेहमीच केंद्रस्थानी असतात,देशाच्या संबंधित महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये नेहमीच सत्ताधारी पवार साहेबांचे मार्गदर्शन घेत असतात.आणि म्हणून आपल्या सर्वांचे आधारवड व कुटूंबप्रमुख‌ असणा-या आदरणीय पवार साहेबांचे अभिष्टचिंतन करत असताना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कृतकृत्य झाल्याचे शेवटी आदरणीय भरणे मामांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर म्हणाले की, पवार साहेब हे एक चालता-बोलता ज्ञानाचं भांडार असून कोणताही विषयावरती असणारा त्यांचा अभ्यास व त्यावर मार्ग काढण्याची सचोटी ही वाखाणण्याजोगी आहे.शेती,कला,साहित्य,क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान,उद्योग आदी क्षेत्रातील त्यांचे असणारे ज्ञान बघता,या देशाच्या सध्याच्या राजकारण-समाजकारणात त्यांच्या तोडीचा एकही नेता नाही हीच शरद पवार साहेबांच्या कर्तृत्वाची पावती आहे.

वयाची ८० पार केलेली असताना या वयात देखील त्यांचा असणारा कामाचा धडाका आजच्या तरुणाईला देखील लाजवेल, साहेबांची असणारी जिद्दी वृत्ती आपण सर्वांनी आत्मसात केली पाहिजेत,प्रत्येक क्षेत्रामधील त्यांचं असलेलं सखोल ज्ञान आणि कामाचा असणारा झंझावात पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणे बळ आणि उमेद निर्माण होते.अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेतृत्व आणि कर्तुत्व उत्तरोत्तर बहरत जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला..
close