shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची लाखेवाडी येथे जयंती साजरी.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची लाखेवाडी येथे जयंती साजरी.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करताना.


इंदापूर प्रतिनिधी: लाखेवाडी ता. इंदापूर येथे देशाचे ग्रामविकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी जि.प. सदस्य श्रीमंत ढोले यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.लाखेवाडी गावात दरवर्षी परंपरेप्रमाणे महान महापुरुषांची जयंती उत्सव साजरे केले जातात. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी हे गाव स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारे असून त्यांच्यावरती  गावातील लोक व समाज प्रेम करत असतो त्यामुळे जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे रथा मधून भव्य अशी हलगीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.  
    यावेळी गावातील सरपंच सोमनाथ गायकवाड, उपसरपंच गणेश चव्हाण,माजी सरपंच शिवलाल खाडे, ज्येष्ठ नेते बाळासो खराडे,बबन खाडे,
दिलीप नागरगोजे, आबासाहेब उगलमोगले,मोहन थोरवे,अनिल माने,माजी उपसरपंच सदाशिव बागल,
सूर्यकांत खाडे,अरुण भिंगारदिवे,
आबासो खाडे,श्यामराव थोरवे, बंडू सानप, वैभव थोरवे,महेश उगलमोगले,संग्राम थोरवे,
ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



.
close