shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे श्री नाथ मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव साजरा.

वडापुरी येथे श्री नाथ मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पुरातन  नाथसंप्रदायतील वडापुरी येथील श्रीनाथ महाराज यांची संजीवन समाधी असून सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक १८ डिसेंबर रोजी हरीनामसंकिर्तन आणि टाळमृदुंगाच्या सुमधुर आवाजाने भक्तिमय वातावरणात अनेक लहान थोर स्त्री पुरुष यांच्या उपस्थितीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम घोष करीत दुपारी बारा वाजता अनेक भक्तांनी पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा साजरा केला.
 यावेळी उपस्थित महिला भाविकांनी श्री दत्तांच्या पाळण्यास झोका देत पाळण्याचे गायन केले आणि श्री दत्ता बद्दल असलेले प्रेम व्यक्त केले.
 यावेळी उपस्थित सर्व भाविकांना पंधारवाडी चे शिवाजी मारुती माने यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व बाल गोपाल लहान-थोर भाविकांनी मनपूर्वक या जन्म सोहळ्याचा आनंद रुपी आशीर्वादाचा लाभ या ठिकाणी घेतला.
close