राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रिकेटच्या मैदानात केली बॅटिंग.
उत्तम आरोग्य मिळण्यासाठी व्यायाम महत्वाचा - श्रीकांत पाटील.
इंदापूर क्रिडा संकुल मध्ये शनिवार दि.१८ ते रविवार दि.१९ डिसेंबर या कालावधीत दरम्यान दोन दिवसीय प्रशासकीय चषक २०२१ चे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: सातत्याने राजकीय आखाडा मध्ये बॅटिंग करणार्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग करीत उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. इंदापूर क्रिडा संकुल मध्ये शनिवार दि.१८ ते रविवार दि.१९ डिसेंबर या कालावधीत दरम्यान दोन दिवसीय प्रशासकीय चषक २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री भरणे यांना खेळण्याचा मोह आवरला नाही.
या दोन दिवस चालणाऱ्या सामन्यामध्ये महसूल,भुमि अभिलेख,पोलीस पाटील, महाराष्ट्र पोलीस,पंचायत समिती,शिक्षक,नगरपरिषद,शिक्षक बीट बावडा,निमगांव केतकी व बावडा,ग्रामसेवक,जलसंपदा, क्रीडा विभाग आणि पत्रकार यांसह विविध विभाग सहभागी झाले आहेत.
क्रिकेटचे २३ संघ तर १३ हाॅलिबाँल संघ यामध्ये सहभागी झाले आहेत.
दरम्यान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणे कुटंबीयांच्या वतीने क्रिकेट च्या सामन्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास २२ हजार तर व्दितीय क्रमांक संपादित करणाऱ्या संघास ११ हजार रूपये याचसोबत हाॅलीबाॅल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास ११ हजार तर व्दितीय क्रमांक संपादित करणाऱ्या संघास ५ हजार रूपये बक्षिस म्हणून रोख स्वरुपात दिले आहेत.
गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक जण कोरोनाचा सामना करत आहे.या कालावधीत शरीरस्वास्थ्य किती महत्वाचे आहे याची प्रत्येकाला जाणीव झाली आहे. उत्तम आरोग्य मिळण्यासाठी व्यायाम महत्वाचा असून शासकीय सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला उत्तम स्वास्थ्य लाभावे आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे काम करावे याकरिता या सामन्यांचे आयोजन केले आहे.अशा पद्धतीचे सामने यापुढे प्रत्येक तीन महिन्याला आयोजित केले जातील ज्यामुळे कर्मचाऱ्यांना एक प्रकारची नवी ऊर्जा भेटेल आणि ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील असे मत यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान नगरसेवक स्वप्निल राऊत व सौ.हेमलता मालूंजकर यांनी पाच वर्षाच्या कालखंडात केलेल्या कार्याची रुपरेषा सादर ककरणाऱ्या कर्तव्यपूर्ती या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा यावेळी राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते पार पडला.
तहसिलदार श्रीकांत पाटील, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, मुख्याधिकारी रामराजे कापरे,तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले,सहा.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे,इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,नगरसेवक स्वप्नील राऊत,माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील,अमोल भिसे, इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत फलफले,वसिमभाई बागवान,संजय शिंदे,क्रिडा शिक्षक शरद झोळ यांसह विविध पदाधिकारी व खेळाडू आणि क्रिडा प्रेमी उपस्थित होते.

