पुरस्कार समारंभाला कविसंमेलनाचा तडका !
श्रीरामपूर । प्रतिनिधी:- समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत समर्पित साधकांचा शोध घेणे आणि त्यांच्या त्या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्याचे जागतिक संविधान व संसद संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अर्थ उपसचिव बबनराव माळी यांनी केले आहे.
श्रीरामपूर मधील व्हि आय पी गेस्ट मध्ये आयोजित दिमाखदार वार्षिक कार्य गौरव पुरस्कार समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य पत्रकार प्रकाश कुलथे हे होते. सेवानिवृत्त रजिस्टार सहकार खाते बाबूराव माळी आणि वर्ल्ड कॉस्टीट्यूशन अँड पार्लमेंटचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. दत्ता विघावे उपस्थित होते.
या प्रसंगी समाजा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंताना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२१ " देऊन सन्मानीत करण्यात आले यामध्ये पत्रकारीतेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल प्रकाश कुलथे . तसेच शैक्षणिक क्षेत्रात गौरवास्पद कामाबद्दल आदिनाथ जोशी या श्रीरामपूरच्या भूमिपूत्रांना गौरवान्वीत करण्यात आले त्याच बरोबर माजीद सय्यद ( पुणे -क्रिडा ), तानाजी धरणे ( रायगड -साहित्य ), अनंतराव भोसले (जळगाव शैक्षणिक ), सचिन कुसनळे ( सांगली -साहित्य, शिक्षण ), दिप्ती नेहर ( अमरावती - सामाजिक ), डॉ. सिमा वाघेला ( मुंबई - सामाजिक व संशोधन ), संदीप गुन( पाश्चिम बंगाल - शैक्षणिक ), डॉ. इंद्रजित मोरे ( सोलापूर -सामाजिक ), अजबसिंग गिरासे ( नंदूरबार -साहित्य व शैक्षणिक ), कांबळे कृष्णा ( सातारा -पर्यावरण ), डॉ. सागी सत्यनारायणा ( हैद्राबाद वैद्यकीय ) तर सविता साळुंके ( श्रीरामपूर - साहित्य ), आशिष जगताप ( पुणे -सामाजिक ) डॉ. अर्जिनबी शेख ( अकोला -शिक्षण व साहित्य ), डॉ रशिद टपाल ( सांगली -सामाजिक व शिक्षण ) व डॉ. गजानन मुधोळकर ( औरंगाबाद -शैक्षणिक ) यांना वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले.
याच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नामवंत अशा निमंत्रित कवींचे कवी संमेलनही पार पडले. यात राज्यातील नामवंत कवींनी सहभाग घेतला. त्यात संगीता फासाटे, तानाजी धरणे, भास्करराव लगड, डॉ.कमलजीत बत्रा, मुकुंद तांबे, आदिनाथ जोशी, सचिन कुसनळे, अजबासिंग गिरासे, सविता साळुंके यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुमधुर सुत्र संचलन प्रा. नवनाथ अकोलकर यांनी केले. तसेच बाबासाहेब वाकचौरे यांनी मान्यवरांना महाराष्ट्रीयन फेटा बांधून कार्यक्रमात रंग भरले. तर डॉ. दत्ता विघावे यांनी प्रास्तविक केले तर प्रा.लेविन भोसले यांनी आभार मानले. वर्ल्ड पार्लमेंट सदस्य सी.के भोसले, ऋषिकेश विघावे, सहसचिव बाबासाहेब वाकचौरे यांनीही विशेष सहकार्य केले.

