अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी
-हर्षवर्धन पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
- भाजपचे जिल्हाधिकार्यांना निवेदन.
![]() |
फोटो :- भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भाजपच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. |
इंदापूर:प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने फळबागा व इतर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबागा व नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी ( दि.६) पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळासह भेटून केली. यावेळी भाजपच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
पुणे जिल्ह्यात तसेच इंदापूर तालुक्यात बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने द्राक्षे, केळी, डाळिंब, पेरू या फळबागांचे तसेच कांदा, शेवगा व मका, ज्वारी, चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. अजूनही कोरोनाचे संकट असल्याने शेती पिकांना चांगला बाजारभाव मिळत नाही. त्यात अवकाळी पावसामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे भेटीप्रसंगी केली. यावेळी भाजप नेत्या व जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर, लालासाहेब पवार, अँड, कृष्णाजी यादव, मारुती वणवे, कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, देवराज जाधव, मोहन दुधाळ, गजानन वाकसे आदी मान्यवर उपस्थित होते.
_____________________________


