shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभूषण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम ; कोरोना योध्ध्यांचा केला सन्मान


प्रतिनिधी : सूर्यकांत होनप

करमाळा : ६ /  सध्या समाजात चांगले कार्य करणाऱ्या माणसाची कमतरता कमी असते त्या दृष्टिकोनातून समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत या दृष्टीकोनातून बुधभूषण फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने गेली कित्येक वर्षे असून विविध क्षेत्रात भरीव व नावलौकिक कामगिरी करणाऱ्या समाजातील चांगल्या अधिकाऱ्यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो असाच सन्मान सोहळा करमाळा येथील उप रुग्णालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर कर्मचारी उमेश शिंदे यांचा बुधभूषण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान देऊन करमाळा तालुका शिवसेना कार्यालयात भव्य सन्मान करण्यात आला.

करमाळा उप रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ . अमोल डुकरे यांनी सामाजिक संस्था असणाऱ्या बुधभूषण फाउंडेशनचा नामोल्लेख करीत सदरची संस्था एक उत्कृष्ट कार्य करीत असल्याचे बोलताना सांगितले .

करमाळा उपरुग्णालयातील कॉम्प्युटर ऑपरेटर उमेश शिंदे यांनी अविरतपणे करमाळा शहर व तालुक्यातील अनेक नागरिकांना लसीकरणाबाबत संगणकाद्वारे पुरेपूर माहिती देऊन शहरातील नागरिकांना सहकार्य केले . या कार्याची दखल घेता बुधभूषण फाऊंडेशनने त्यांचा यथोचित सन्मान केला असे बुधभूषण सामाजिक संस्थेचे व्हा . चेअरमन दुर्गेश राठोड यांनी बोलताना सांगितले . बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने कुटीर रुग्णालय करमाळा येथील उमेश शिंदे (डाटा इंन्ट्री ऑपरेटर ) व आलिशान पठाण मॅडम यांना सन्मान पत्र बापूसाहेब मोरे  शिवसेना संपर्क प्रमुख  यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी सुधाकर लावंड (शिवसेना तालुका तालुका प्रमुख ), बाळासाहेब पवार ,(सरपंच हिसरे,) श्रीहरी तळेकर (उप तालुका प्रमुख शिवसेना),  प्रवीण कटारिया (शहर अध्यक्ष शिवसेना ) अमोल यादव ,प्रमोद भाग्यवंत , यांच्या सह बुधभूषण फाउंडेशनचे व्हा .चेअरमन दुर्गेश राठोड उपस्थित होते.  

बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने सर्व नागरिकांना कोविड लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. बुधभूषण फाउंडेशनद्वारे 200 पेक्षा जास्त लोकांना कोविडचे डोस देण्यात आले. या उपक्रमात वैद्यकीय अधीक्षक डुकरे साहेब ,सुनीता भोसले मॅडम,पठाण मॅडम , परिसेविक ढाकणे मॅडम ,चव्हाण साहेब आदींनी परिश्रम घेतले. या फाउंडेशनचे चेअरमन अमोल दुरंदे यांनी या सर्वाचे आभार मानले .
close