shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवण येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पुर्व तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

भिगवण येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पुर्व तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
इंदापूर प्रतिनिधी: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार दि.०६ डिसेंबर पासून इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या पुर्व तपासणी शिबिरास सुरवात झाली आहे. भिगवण येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये आज ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.  जेष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांनी या तपासणी शिबिरासाठी सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली .
यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर,पंचायत समिती सदस्य दादासो वणवे,नवनाथ रूपनवर,सचिन बोगावत, माजी तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील,माजी कार्याध्यक्ष अमोल भिसे,संग्रामसिंह पाटील,महिला तालुकाध्यक्ष श्रीमती. छाया पडसळकर,युवती तालुकाध्यक्ष अश्विनी कुर्डे,मनोज राक्षे,भिगवणचे मा.सरपंच महेश शेंडगे,काझड गावचे सरपंच अजित पाटील,सतिश शिंगाडे,मेहबूब शेख,विजयकुमार गायकवाड,रोहित हेळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close