इंदापूर मध्ये व्यंकटेशनगर येथे नूतन श्री साई सेवा क्लीनिकचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व्यंकटेशनगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शेजारी डॉक्टर प्रदीप दडस यांच्या श्री साई सेवा क्लीनिकचे उद्घाटन त्यांचे वडील विठ्ठल दडस यांच्या हस्ते व
राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर शहराचे अध्यक्ष श्रीनिवास सातपुते, हर्षवर्धन रुपनवर अक्षय हेगडकर सुखदेव यमगर दिलीप कुंभार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मध्ये संपन्न झाला.
यावेळी विठ्ठल दडस म्हणाले की, माझ्या मुलाने माझ्या कष्टाला न्याय देत त्याच्या अभ्यासातून आणि जिद्दीतून स्वतःचे जीवनमान उंचावत रुग्णांची सेवा मनाशी बाळगून डॉक्टर क्षेत्रांमध्ये श्री साई सेवा क्लिनिकची उभारणी करून जनतेच्या सेवेचे दार खुले केले त्याबद्दल मला विशेष अभिमान वाटतो त्याच्या या क्षेत्रास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सर्वांनी डॉक्टर शुभेच्छा दिल्या.

