shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरडगांव शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१  
राहुरी :  तालुक्यातील आरडगांव शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंज-यात अलगत अडकला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
         आरडगाव येथील खुरुद वस्ती येथे गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार होता. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले होते. दरम्यान ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा आरडगाव दौरा असताना नागरीकांच्या मागणी नुसार खुरुद वस्तीवर बिबट्याला कैद करण्यासाठी वनविभाने पिंजरा लावण्याचे आदेश ना.तनपुरे यांनी दिले होते. ना.तनपुरे यांच्या आदेशानुसार तेथे लावण्यात आलेल्या पिंज-यात आज शुक्रवारी सकाळी बिबट्या कैद झाला आहे. 

"गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा गुप्ता संचार होता. त्यामुळे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांना पिंजऱ्याची मागणी केली. त्यांनी तात्काळ वनविभागा मार्फत पिंजरा उपलब्ध करून दिला. त्यामुळे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.
_ डॉ सचिन खुरुद, आरडगांव शेतकरी"
 
      घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी करत ना.तनपुरे यांचे आभार व्यक्त केले आहे. वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सतिश जाधव, वनपाल भगवान परदेशी, वाहक ताराचंद गायकवाड, महदेव शेळके, बबनराव जाधव, रहिम पटेल, बाबासाहेब सिनारे आदिंनी हा बिबट्या ताब्यात घेतला आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close