shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून राहुरी शहरात झालीय कोट्यावधी रुपये खर्चाचे विकास कामे सुरू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१.

राहुरी  : शहरातील विविध विकास कामांकरिता सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना मंत्री तनपुरे यांनी सांगितले की नगरपालिकेच्या निवडणुकीत जाहीरनाम्यामधील असलेल्या जलतरण तलाव उभारणीस सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या जागेत जलतरण तलाव सर्व सुविधायुक्त उभारला जाणार आहे. स्टेशन रस्त्यावरील पाण्याची टाकी ते श्रीहरी मंगल कार्यालय येथपर्यंत सुमारे चार कोटी रुपये खर्चाचे रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण कामास मान्यता मिळालेली आहे. तसेच स्टेशन रस्त्यावरील महात्मा फुले चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी 36 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. या तीनही कामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. मी नगराध्यक्ष असताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात असून आणखीही निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून बरीचशी कामे मार्गी लागतील केंद्रात व राज्यात आपल्या विचाराचे सरकार नसल्याने निधी मिळत नव्हता. मी आमदार व थेट राज्यमंत्री झाल्यानंतर निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे विकासाचा गाडा वेगाने पुढे जात आहे. बस स्थानक इमारतीचा प्रश्न मार्गी लागला होता. 17 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात झाली होती. परंतु एसटीचा संप सुरू झाल्याने निधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे वर्ग झाला असे असले तरी पुन्हा नव्याने निधी प्राप्त करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.

"राहुरी शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार जलतरण तलावासाठी (swimming pool) दोन कोटी साठ लाख रुपये मंजुर झाले आहेत. सर्व सोयीन्नी सुसज्ज असा हा स्विमिंग पूल निश्चितच राहुरीकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल.
   नगरपालिकेत मी नगराध्यक्ष असताना आपल्या विचाराचे सरकार नसल्याने विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नव्हता. आता मात्र आपल्याच गावातील माणुस आमदार व मंत्री आहे. येणाऱ्या काळात राहुरी शहरात अशी आणखी विकास कामे होतील हा माझा शब्द आहे." - नामदार प्राजक्त तनपूरे.
शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक चे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास जात असल्याने जाहीरनाम्यातील वचन पूर्ण केले आहे. राहुरी शहरातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून कामे मार्गी लागत असल्याचे समाधान लाभत आहे. शहरातील महत्त्वकांक्षी योजनांना चालना देण्याचे काम सुरू असून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण विडा उचललेला आहे. शहरवासीयांचे मौलिक सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close