शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१
राहुरी : गुरुवारी राहुरीत प्रहार जनशक्ती संघटनेने विविध मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनकर्त्यांची धरपकड झाली असतानाच रात्री उशिरा या आंदोलकांवर राहुरी पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळ्यासह आत्महत्येच्या प्रयत्नाबरोबरच अन्य विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पौलिस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक छबा शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, आरोपी सुरेश दत्तात्रय लांबे रा. पिंपरी अवघड, विनोदसिंह महादू परदेशी रा. निंबोडी ता. नगर, नितीन अशोक पानसरे रा. कोल्हार खुर्द, बाबू सखाराम तमनर रा. पिंपरी अवघड, देविदास जगन्नाथ येवले रा. वाघवड जेऊर ता.नगर हे दिनांक २ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.२१ वाजता नगर-मनमाड राज्य महामार्गावर राहुरी बु येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर फिर्यादी व पोलीस कर्मचारी रास्तारोकोचा बंदोबस्त करीत असताना वरील आरोपी यांनी लोकांचा जमाव जमवून अनाधिकाराने रस्ता अडवून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केला व जनतेची गैरसोय करण्याचे उद्देशाने रास्तारोको केला. त्यांना सौम्यबळाने ताब्यात घेतले असता त्यांनी कर्तव्यावरील पोलिसांना धक्काबुक्की केली व दुखापत करुन जखमी केले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
तसेच यातील आरोपी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी यांनी सरकारी वाहन क्रमांक एम.एच.१६ एन ५५२ ची मागील काच फोडून नुकसान केले व सदरच्या काचेचा तुकडा आत्महत्या करण्याचे उद्देशाने स्वतः चे डोक्यात मारुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी आंदोलनासंदर्भान्वये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा याकरिता आंदोलनापुर्वी दिलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ चे नोटिसान्वये दिलेल्या सुचनांची व प्रत्यक्ष आंदोलनस्थळी दिलेल्या सुचनांची अवहेलना करून आंदोलन केले. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

