shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाॅ. तनपुरे कारखाना मोडीत काढण्याचा खा. सुजय विखे यांचा डाव-अमृत धुमाळ..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१

डाॅ. तनपुरे कारखाना मोडीत काढण्याचा खा. सुजय विखे यांचा डाव-अमृत धुमाळ..!!


राहुरी : राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये जमीन विक्री, मोलेसेस विक्री, भंगार विक्री, गौण खजिन, शैक्षणिक संस्था व विवेकानंद नर्सिंग होम मध्ये प्रवरा परिसरातील मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून कारखाना सभासद व संचालक मंडळाला विश्वासात न घेता गलथान व भ्रष्ट कारभार करून कारखाना मोडीत काढण्याचे खा. सुजय विखे यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप रामदास धुमाळ युवा मंचचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी केला आहे.
रविवारी सायंकाळी राहुरी येथे पत्रकार परिषदेमध्ये धुमाळ यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ पवार, अशोक ढोकणे, नामदेव कुसमाडे, प्रदीप भुजाडी, विनोद मुसमाडे, दादासाहेब पवार, कोंडीराम विटनोर, द्वारकानाथ जाधव आदी उपस्थित होते.

धुमाळ बोलताना पुढे म्हणाले की, राहुरी कारखान्यामध्ये सभासदांच्या उसाचे गाळप न करता चुकीच्या नियोजनामुळे तालुक्याबाहेरील ऊस आणून गाळप सुरू असून सभासदांना वंचित ठेवण्याचे काम हे करत आहेत. मागील झालेल्या गाळापात शेतकरी सभासदांना एफआरपीप्रमाणे उसाचे पेमेंट न करता अद्याप देखील ते पेमेंट थकीतच आहे. तसेच गाळप परवाना नसताना कारखाना विना परवाना चालु करून बाहेरील कार्यक्षेत्रातील ऊस आयात करून उसाचे गाळप सुरू आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून या  बेजबाबदारपणामुळे कारखाना आणि सभासदांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच कारखाना सभासदांच्या मालकीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, स्वामी विवेकानंद नर्सिंग होम व लक्ष्मीनारायण ट्रस्ट या संस्थेवर प्रवरा सहकारी बँकेचे कोट्यवधीचे कर्ज काढून संस्थेची जमीन विक्री केली आहे.

 

या संदर्भात शैक्षणिक संस्थांवर कुठलेही प्रकारचे कर्ज काढू नये व जमीन विक्री करू नये यासाठी माननीय उच्च न्यायालयात ओरंगाबाद खंडपीठ न्यायालयात सभासदांच्या वतीने हरकत घेतली असून न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक हे कुठलेही शैक्षणिक पात्रता नसताना पाच वर्षापासून कारखान्याचा आर्थिक व्यवहार करत आहे. ही बाब देखील कारखान्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. यासंदर्भात साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे तक्रार करून वेळोवेळी समक्ष भेटून चर्चा केली आहे. तसेच भविष्यात या कारखान्याच्या भवितव्यासाठी आम्ही एकञित येऊन मोठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे देखील अमृत धुमाळ यांनी म्हटले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close