shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विजेच्या तारांच्या घर्षणामुळे स्पार्किंग होवून साकुरीत जळाला ५ एकर ऊस..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१   
राहाता : तालुक्यातील साकुरी येथील विशाल महेश रोहोम व सदाशिव विश्‍वनाथ रोहोम यांच्या मालकीच्या ५ एकर क्षेत्रातील उभा ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे स्पार्किंग होवून जळाला आहे. या दोन्ही शेतकर्‍यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हा प्रकार काल दुपारी ०३ वाजता घडला. साकुरी येथे नगर मनमाड हायवे लगत कै. महेश सदाशिव रोहोम व त्यांचे वडील सदाशिव विश्‍वनाथ रोहोम यांच्या गट नंबर ३११ मधील पाच एकर क्षेत्रातील ऊसावरुन विज वितरण कंपनीची मुख्य वाहिनी गेलेली आहे. या वाहिनीच्या तारा काल दुपारी एकमेकांच्या संपर्कात आल्या. दुपारी ०३ वाजता तारांच्या घर्षणाने थिणग्या ऊसाच्या पिकावर पडू लागल्याने या थिगण्यातुन ऊसाला आग लागली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close