सार्थ निवड अभिमान संस्थेचा..!
शिर्डी । प्रतिनिधी:-
वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या नुकत्याच झालेल्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या मासिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या " तज्ञ संचालक पदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.श्री.दीपक भाऊ धट यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर मा.संचालक मंडळाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यापुढे त्यांच्याकडून संस्थेच्या हिताच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन व विधायक सूचनांच्या माध्यमातून संस्थेला यशोशिखरावर नेण्यात मौलिक साथ मिळेल, यात शंका नाही. संस्थेच्या प्रगतीत मा.संचालक मंडळाचा सिंहाचा वाटा असून आपल्या सभासदांना अधिकाधिक डिजिटल बँकिंग सेवा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
मा.संचालक मंडळाच्या वतीने वसंतदादा मल्टिस्टेट परिवारात आदरणीय दीपक भाऊंचे सहर्ष स्वागत व खुप खुप शुभेच्छा.
🏳️🌈।।जय सहकार।।🏳️🌈

