shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नव्या वर्षांमध्ये आपले शहर स्वच्छ सुंदर हरित व कचरामुक्त करण्यासाठी आपले योगदान देऊन इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करा - अंकिताताई शहा.

नव्या वर्षांमध्ये आपले शहर स्वच्छ सुंदर हरित व कचरामुक्त करण्यासाठी आपले योगदान देऊन इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करा - अंकिताताई शहा.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहर "स्वच्छ,स्वस्थ, सुंदर हरित व प्लास्टिक मुक्त होण्यासाठी नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे; नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांचे शहरवासीयांना आवाहन केले.
इंदापूर नगर परिषदेच्या वतीने शासनाच्या माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा २०२२ अभियानांतर्गत आज शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपले इंदापूर शहर स्वच्छ,स्वस्थ, सुंदर हरित व प्लास्टिक मुक्त होण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी  व्हावे यासाठी सायकल रॅलीद्वारे पर्यावरणाबाबत  तसेच स्वच्छते बाबत घोषवाक्य व घोषणा द्वारे संदेश देत शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

तत्पूर्वी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी  रामराजे कापरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की 

या वेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे म्हणाले की नागरिकांनी उद्या सुरू होणाऱ्या नव्या वर्षांमध्ये आपले शहर स्वच्छ सुंदर हरित व कचरामुक्त करण्यासाठी आपले योगदान देऊन इंदापूर नगरपरिषदेस सहकार्य करावे.

 या मुळे आपले इंदापूर शहर लवकरच रोगराई मुक्त होईल तसेच स्वच्छ सुंदर हरित दिसेल.

 आज पर्यावरणामध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी अत्यंत वेगाने वाढत आहे त्यामुळे या पृथ्वीतलावरील सर्व  सजीवांना हनी पोचणार आहे. जर आपल्याला प्रदूषणाची पातळी कमी करायचे असेल तर नागरिकांनी मोटरसायकलचा किंवा चारचाकी वाहनांचा वापर न करता आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी सायकलचा वापर करावा जेणेकरून आपल्याला हवेतील प्रदूषणाची पातळी रोखण्यास मदत होऊन आपले आरोग्य स्वस्थ होईल. 

तसेच नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, कचरा उघड्यावर टाकू नये, कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा करून घंटागाडीत द्यावा असे आवाहन या वेळी करण्यात आले.

या वेळी इंदापूर नगर परिषदेचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व नागरिक यांनी माझी वसुंधरेची शपथ घेतली. त्यानंतर नगराध्यक्ष  सौ अंकिता मुकुंद शहा यांनी झेंडा दाखवल्यानंतर सायकल रॅलीस सुरवात करण्यात आली. रॅली चाळीस फुटी रोड, दर्गा मजीत चौक ,भिसे गिरणी ते शास्त्री चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक खडकपुरा येथून मेन रोड, नेहरू चौक ,इंद्रेश्वर मंदिर ते बगीचा रोडने बाबा चौक येथून पुन्हा नगर परिषदेच्या प्रांगणात येऊन रॅलीची समाप्ती करण्यात आली.


या वेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, इंदापूर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी तसेच सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाचे शिक्षक  सुनील मोहिते सर व विद्यार्थी यांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
close