भरतशेठ शहा यांचे हस्ते ह .चांदशाहवली बाबांच्या झेंडयाची विधिवत पुजा.
ग्रामप्रदिक्षणा पुर्ण झाले नंतरउरूसाची तीन दिवसाची सांगता.
इंदापूर प्रतिनिधी: सोमवार दि .१३ रोजी संध्याकाळी ८ वाजता इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक व कर्मयोगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा यांचे हस्ते बाबांच्या झेंडयाची विधिवत पुजा होऊन फटाक्यांची अतिषबाजी व तोफांची सलामीत आणि भक्तांकडून झेंडयावर रेवड्यांची उधळण करून ह .चांदशाहवली बाबांच्या झेंडा ग्राम प्रदिक्षणेला जल्लोषात सुरुवात झाली. बाबांच्या झेंड्यास भाविकांकडून श्रध्देपोटी नारळाचे तोरण बांधतात .
यावेळी मा . नगरसेवक शेरखान पठाण,आझाद पठाण, महादेव च०हाण, हमीदभाई आतार, मुनीर कुरेशी, संतोष भंडलकर, मुनीर ममुजावर,सागर गानबोटे, गणेश महाजन, दादा पिसे ,मुख्तार सय्यद , भाविकांची आणि महिलावर्गाची लक्षवेधी गर्दी होती.ग्रामप्रदिक्षणा पुर्ण झाल्यानंतर पुन्हा विधीवत पुजा होऊन तीन दिवस चालणाऱ्या उरूसाची सांगता झाली .

