shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दर महिन्याच्या मोठ्या एकादशीला किर्तन सोहळ्याचे आयोजन करणार - विजय कोते..!!

शिर्डी प्रतिनिधी :
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की शिर्डी माझे पंढरपुर साईबाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला किर्तन सोहळा शिर्डी येथे करावा अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे असा दृष्टांत देखील काही साईभक्तांना झालाय तो अनुभव भक्तांनी परम साईभक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजुभाऊ कोते यांना सांगितला व हा बाबांचा आदेश समजून विजुभाऊ कोते यांनी ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशी ला किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल असे विजुभाऊ कोते म्हणाले पहिली कीर्तनाची सेवा श्री स्वामी महंत ह भ प काशीकानंदजी महाराज ज्ञानेश्वर महाराज आश्रम शिर्डी हे करणार आहेत.

मंगळवार दिनांक 14/12/2021 रोजी वेळ संध्याकाळी 7 ते 9 वाजता होणार आहे प्रथम कीर्तना चे ठिकाण विजुभाऊ कोते यांच्या वस्तीवर शेवता ताई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्यातील किर्तन श्रवणाचा व साई खिचडीचा लाभ घ्यावा अशी विनंती विजू भाऊ कोते व ताराचंद भाऊ कोते यांनी केली आहे.
close