shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या लोकांना रेशनकार्ड वाटप आणि विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१ 
 
ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या लोकांना रेशनकार्ड वाटप आणि विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला..!!


अहमदनगर : नगर तालुक्यातील पिंपळगांव माळवी येथे भिल्ल समाजातील लोकांना आदिवासी विकासमंत्री प्राजक्त तनपुरे व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष व आदिवासी समाज्याचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण यांच्या हस्ते नवीन 76 रेशनकार्ड वाटप करण्यात आले.

नगर तालुक्यातील पिंपळगांव माळवी येथे भिल्ल समाजातील लोकांना नवीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी तहसील कार्यालय नगर येथे आदिवासी समाज्याचे अध्यक्ष राम चव्हाण यांच्या अर्जाची दखल घेऊन या अनुशंगाने आदिवासी भिल्ल समाजातील लोकांना नवीन रेशनकार्ड वाटप केले.

  यावेळी सागर गुंड, झिने सर, अशोक शिंदे, बाबासाहेब झिने व अदिवासी विकास परिषदेचे व राष्ट्रवादीचे सामाजी न्याय विभागाचे सावता चव्हाण, कुणाल काळे, महेश चव्हाण, बाळु काळे आदिंसह आदिवासी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        तसेच पिंपळगाव माळवी येथील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पिंपळगाव माळवी ते विळद या रस्त्यासाठी सुमारे २ कोटी ४९ लक्ष, पिंपळगाव माळवी ते गवारे वस्तीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ६४ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.  

पिंपळगाव माळवी ते भोपते तलाव रक्कम रु. १६ लक्ष या रस्त्यांचे खडीकरणही पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा आज केला. पिंपळगाव माळवीसाठी हे जोडरस्ते मिळाल्याने गावातील लोकांसाठी वाहतुक सुरळीत होणार आहे. 
पिंपळगाव माळवी गावातील लोकांना विजेच्या समस्या भेडसावत होत्या. सदर गावठाणातील अतिरिक्त भार कमी व्हावा यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन केले. तसेच पिंपळगाव माळवी बस स्टँड वर एक हायमॅक्सचे लोकार्पण केले. वेळोवेळी योग्य सोयीसुविधा देण्यासाठी मी कायम कटीबद्ध आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close